Madha Assembly Constituency : अभिजीत पाटलांचे राजकीय सिबिल खराब; संजय कोकाटेंचा टोला

Abhijeet Patil Vs Sanjay Kokate : माढा मतदारसंघातील उमेदवारीचा तिढा शरद पवार यांची डोकेदुखी वाढविण्याची शक्यता दिसून येत आहे. कारण माढ्यातून विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून सर्वाधिक इच्छूक आहेत.
Abhijeet Patil-Sanjay Kokate
Abhijeet Patil-Sanjay KokateSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 16 August : माढा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढविण्यासाठी सर्वाधिक इच्छूक असल्याचे दिसून येत आहे. शिंदे कुटुंबाबरोबरच संजय कोकाटे, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांचेही नाव चर्चेत आहे.

मात्र, अभिजीत पाटील हे नुकतेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्टेजवर होते, त्यामुळे पाटील यांचे राजकीय सिबिल खराब आहे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माढ्यातील इच्छूक संजय कोकाटे यांनी लगावला.

माढा मतदारसंघातील (Madha Constituency) उमेदवारीचा तिढा शरद पवार यांची डोकेदुखी वाढविण्याची शक्यता दिसून येत आहे. कारण माढ्यातून विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून सर्वाधिक इच्छूक आहेत. त्यात विठ्ठल साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील (Abhijeet Patil) यांचेही नाव चर्चेत आहे. त्यावरून संजय कोकाटे यांनी पाटील यांना टोला लगावला आहे.

संजय कोकाटे (Sanjay Kokate) म्हणाले, गेल्या पाच वर्षांतील गणित पाहता, ज्यांना कोणाला भीती दाखवू शकतील, ईडीची नोटीस निघू शकते किंवा कोणाचं काळं बेरं निघू शकेल, असा कोणत्याही नेत्याला महाविकास आघाडी उमेदवारी देईल, असे मला वाटत नाही.

Abhijeet Patil-Sanjay Kokate
Aditya Thackeray : आदित्य ठाकरे वरळी सोडणार, मुंबईतील सुरक्षित ‘या’ मतदारसंघावर डोळा; भाजप नेत्याचा गौप्यस्फोट

माढ्यातून अभिजीत पाटील यांच्या उमेदवारीचा विषय असेल तर ते अरण येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर स्टेजवर होते. आपण एखाद्या बॅंकेचे कर्ज काढल्यानंतर भरले नाही, तर आपलं सिबिल खराब होतं.

तसं अभिजीत पाटील यांचं राजकीय सिबिल खराब झालं आहे. माढ्यातून निवडणूक लढविण्यासाठी ते इच्छूक आहेत, हे सर्व समोर दिसतंय. ते स्वतंत्र आहेत, असेही कोकाटे यांनी नमूद केले.

ज्यांना निवडणूक लढवायची आहे, ते लढवू शकतात. माझा विषय तुतारीच्या उमेदवारीबाबत आहे. माझं स्पष्ट मत आहे की, लोकसभा निवडणुकीत तुतारीचा प्रचार केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील व्यक्तीलाच माढ्यातून विधानसभेची उमेदवार मिळणार आहे, असा विश्वास संजय कोकाटे यांनी व्यक्त केला.

Abhijeet Patil-Sanjay Kokate
Jayant Patil : महाविकास आघाडी सरकारमध्ये जयंत पाटील असणार अर्थमंत्री; दोन नेत्यांनी भाषणातून दिले संकेत

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com