Madha Politics : बबनदादा हे शरद पवारांना भेटताच माढा विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसने केला दावा

Congress Claim on Madha Constituency : आमदार बबनराव शिंदे हे राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवारांना सोडून अजित पवारांसोबत गेले आहेत. शरद पवार गट हा माढ्यात प्रबळ उमेदवाराच्या शोधात आहे. त्यातच आता माढ्यातील काँग्रेसचे माजी आमदार धनाजी साठे यांच्या गटाकडून मतदारसंघावर दावा केला आहे.
Babanrao Shinde-Meenal Sathe-Sharad Pawar
Babanrao Shinde-Meenal Sathe-Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 05 August : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माढ्याचे आमदार बबनराव शिंदे आणि त्यांचे चिरंजीव रणजितसिंह शिंदे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची कालच (ता. 04 ऑगस्ट) भेट घेतली. त्यानंतर आज (ता. 05 ऑगस्ट) काँग्रेस पक्षाने तातडीने माढा विधानसभा मतदारसंघावर दावा केला आहे.

त्यामुळे आगामी काळात महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात माढा मतदारसंघावरून रस्सीखेच होण्याची चिन्हे आहेत.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत माढा विधानसभा मतदारसंघ (Madha assembly constituency) हा कामय राष्ट्रवादी काँग्रेसला सुटत आलेला आहे. सध्या राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेची महाविकास आघाडी आहे. या महाविकास आघाडीत कोणता मतदारसंघ कोणाच्या वाट्याला येणार, हे अजून निश्चित नाही.

विद्यमान आमदार बबनराव शिंदे (Babanrao Shinde) हे राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवारांना सोडून अजित पवारांसोबत गेले आहेत. शरद पवार गट हा माढ्यात प्रबळ उमेदवाराच्या शोधात आहे. त्यातच आता माढ्यातील काँग्रेसचे माजी आमदार धनाजी साठे यांच्या गटाकडून मतदारसंघावर दावा करण्यात आलेला आहे.

माढ्यातून या वेळी बबनराव शिंदे यांच्याऐवजी त्यांचे चिरंजीव सोलापूर जिल्हा दूध संघाचे (दूध पंढरी) अध्यक्ष रणजितसिंह शिंदे हे निवडणूक लढविण्याची चर्चा आहे. मात्र, माढ्यात लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या तुतारीचा बोलबाला दिसला आहे, त्यामुळे आमदार बबनराव शिंदे यांनी मुलासह शरद पवार यांची घेतलेली भेट महत्वपूर्ण ठरत आहे. मात्र, शिंदेंनी शरद पवारांची भेट घेताच माढ्यातील साठे गटाने मतदारसंघावर दावा केला आहे.

Babanrao Shinde-Meenal Sathe-Sharad Pawar
Raj Thackeray On Reservation : आरक्षणाबाबत राज ठाकरेंचे मोठे विधान; ‘महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरजच नाही’

माजी आमदार धनाजी साठे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून माढा विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. माढा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा मीनल साठे यांना माढा मतदार संघातून काँग्रेसकडून उमेदवारी देण्याची मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे.

माढा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून जनसंवाद यात्रा काढण्यात येणार आहे. माढा लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा धर्म पाळून काँग्रेसने राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवाराचा प्रचार करण्यात आला होता. आता विधानसभेला महाविकास आघाडीकडून माढा विधानसभा मतदारसंघातून मीनल साठे यांना उमेदवारी द्यावी, अशी काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणी आहे.

Babanrao Shinde-Meenal Sathe-Sharad Pawar
Raj Thackeray Solapur PC : राज ठाकरे पुतण्या आदित्य ठाकरेंच्या विरोधात उमेदवार देणार; मनसेचा वरळीचा उमेदवारही निश्चित!

माढा विधानसभा संघावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीतील घटकपक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटात माढा मतदासंघावरून राडा होण्याची चिन्हे आहेत. बबनराव शिंदे आणि रणजितसिंह शिंदे यांनी शरद पवारांची घेतलेली भेट, काँग्रेसने मतदारसंघावर केलेला दावा यामुळे महाविकास आघाडीतील वातावरण माढा मतदारसंघावरून तापण्याची शक्यता आहे.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com