Grampanchyat Election : महाजनांना जळगावमध्येच धक्का : राष्ट्रवादी, शिवसेना, शिंदे गटाचे वर्चस्व; भाजप-काँग्रेसला भोपळा

या १३ ग्रामपंचायतींपैकी शिवसेना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येकी तीन ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. उर्वरीत चार ग्रामपंचायतींवर अपक्षांनी बाजी मारली आहे.
Gram Panchayat Result
Gram Panchayat ResultSarkarnama
Published on
Updated on

जळगाव : जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत (Gram Panchayat) ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना मोठा धक्का बसला आहे. जिल्ह्यात झालेल्या १३ ग्रामपंचायतींपैकी एकही ग्रामपंचायत भारतीय जनता पक्षाला (BJP) जिंकता आलेला नाही. या १३ ग्रामपंचायतींपैकी शिवसेना (shivsena), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट (Eknath Shinde) आणि राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) प्रत्येकी तीन ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. उर्वरीत चार ग्रामपंचायतींवर अपक्षांनी बाजी मारली आहे. भाजपबरोबरच काँग्रेस (Congress) पक्षाचीही पाटी या निवडणुकीत कोरी राहिली आहे. (In Jalgaon, BJP has not been able to win a single Gram Panchayat)

जळगाव जिल्ह्यातील तेरा ग्रामपंचायतींसाठी रविवारी चुरशीने मतदान झाले होते. गावपातळीवरील निवडणुका असल्याने सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या नेटाने किल्ला लढवला होता. राज्यात भाजपसह शिंदे गटाचे सरकार आल्याने भाजपच्या अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र, भाजप आणि काँग्रेस पक्ष वगळता इतर पक्षांनी चांगली कामगिरी केली आहे. या दोन्ही पक्षाला मात्र भोपळाही फोडता आलेला नाही.

Gram Panchayat Result
भोरमध्ये राष्ट्रवादीचा थोपटेंना धक्का; सरपंचपदासह दोन्ही ग्रामपंचायतींवर फडकवला झेंडा

जळगाव जिल्ह्यातील गावनिहाय ग्रामपंचायत निकाल. गाव-विजयी सरपंच आणि पक्ष या क्रमाने :

१) सत्रासेन- वंदना ज्ञानेश्वर भादले, (राष्ट्रवादी)

२) बोरमळी/देव्हारी- जुनाबाई किसन पाडवी, (शिवसेना)

३) मोहरद- अंजुम रमजान तडवी, (शिंदे गट)

४) वैजापूर- दत्तरसिंग सुभाष पावरा, (शिंदे गट)

५) कर्जाने- अलका सतीश बारेला, (अपक्ष)

६) पिंप्री- वकील शिवाजी इंगळे, (शिंदे गट)

७) उमर्टी- रिनेश रमेश पावरा, (राष्ट्रवादी)

८) मोरचिडा- हरिश्चंद्र सोनसिंग भादले, (राष्ट्रवादी)

९) कृष्णापूर- पिनबाई गेमा बारेला, (शिवसेना)

१०) बोरअजंटी- शकुंतला धरमसिंग बारेला, (अपक्ष)

११) मेलाणे- लालबाई प्रताप पावरा, (अपक्ष)

१२) मालोद -रमाबाई भारसिंग बारेला (शिवसेना)

१३) परसाळे बुद्रुक- मीना राजू तडवी (अपक्ष)

Gram Panchayat Result
कटकारस्थान करून त्यावेळी मला मुख्यमंत्रिपदावरून काढलं अन्‌ राज्यपाल केलं : सुशीलकुमार शिंदेंचा स्वकीयांवर हल्ला

ग्रामपंचायतची पक्षनिहाय निकाल : एकूण ग्रामपंचायती : १३, निकाल जाहीर : १३ :

शिवसेना : ०३

शिंदे गट : ०३

भाजप : निरंक

राष्ट्रवादी : ०३

काँग्रेस : निरंक

अपक्ष : ०४

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com