
Karad, 17 July : सातारा जिल्ह्यात आणखी एका युवा नेत्याची राजकारणात एन्ट्री झाली आहे. सातारा जिल्ह्यातील काँग्रेसचे बडे प्रस्थ, माजी सहकार मंत्री (स्व.) विलासराव पाटील-उंडाळकर यांचे नातू आणि रयत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांचे सुपुत्र आदिराज पाटील यांची कोयना सहकारी बॅंकेच्या संचालकपदी नियुक्ती झाली आहे. या नियुक्तीमुळे उंडाळकर कुटुंबीयांची तिसरी पिढी सहकाराच्या माध्यमातून राजकारणात उतरली आहे.
कोयना सहकारी बॅंकेच्या (Koyna Cooperative Bank) संचालकपदाच्या माध्यमातून विलासकाका उंडाळकर यांच्या नातवाची पहिल्यांदाच सहकारी संस्थेत इंट्री झाली आहे. विलासकाका उंडाळकर यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या कोयना सहकारी बॅंकेची निवडणूक बिनविरोध झाली असून सभासदांनी नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.
विलासकाका उंडाळकर ((Vilasakaka Undalkar)) हे कऱ्हाड दक्षिण या मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर तब्बल सात वेळा निवडून आले आहेत. त्यांनी आयुष्याच्या शेवटपर्यंत काँग्रेसची विचारधारा जोपसली. त्यांना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी कऱ्हाड दक्षिण मतदासंघ सोडावा लागला. मात्र त्यांंनी काँग्रेसची साथ सोडली नव्हती. राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांना ऑफर असतानाही त्यांनी ती नाकारली होती.
दरम्यान, विलासकाका यांच्यानंतर त्याचे चिरंजीव ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर हे त्यांचा राजकीय वारसा पुढे चालवत आहेत. त्यांनी नुकताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. आता त्यांचे चिरंजीव आदिराज पाटील उंडाळकर बॅंकेच्या संचालकाच्या माध्यमातून राजकारणात उतरले आहेत.
माजी सहकार मंत्री विलासकाका पाटील (उंडाळकर) यांनी कऱ्हाड तालुक्यातील कोयना दूध संघ, खरेदी विक्री संघ, बाजार समिती, कोयना बॅंक यांसह रयत संघटनेशी संबंधित सर्वच सहकारी संस्था उत्तमरित्या चालवून सहकार क्षेत्रात नवे मापदंड घालून दिले आहेत. त्यांच्या कारकिर्दीत सर्वसामान्य कुटुंबातील अनेकांना सहकारी संस्थावर प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली आहे. अनेक सहकारी संस्था त्यांनी आर्थिक शिस्त चालवून कऱ्हाड तालुक्यात सहकारी संस्था भक्कम केल्या. आता त्यांचे चिरंजीव ॲड. उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली या सहकारी संस्थांची वाटचाल सुरु आहे.
कोयना सहकारी बॅंकेची स्थापना 1996 मध्ये उंडाळकरांच्या मार्गदर्शनाखाली झाली. बॅंकेच्या निवडणुकीत युवा नेते अदिराज पाटील (उंडाळकर) यांची संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे. ॲड.उदयसिंह उंडाळकरांनी नवनिर्वाचित संचालकांचे स्वागत केले असून कामकाजात सहकार्य करण्याचा शब्द दिला आहे.
बॅंकेचे नवनिर्वाचित संचालक मंडळ
कोयना सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळात अदिराज पाटील (उंडाळकर) तुकाराम डुबल (म्होप्रे), हणमंत देसाई (वाठार), बाळासाहेब जाधव (पाडळी), राजकुमार पाटील (अंबवडे), सुजित थोरात (कार्वे), कृष्णत पाटील (काले), साहेबराव शेवाळे (कऱ्हाड), महादेव पाटील (वारुंजी), सागर जाधव (आगाशिवनगर-मलकापूर), सीमा पाटील (आटके), रेश्मा पाटील (तांबवे), संपत बडेकर (सुपने), नदीम सुतार, (कऱ्हाड), लालासाहेब गिरी (मरळी-चोरे) यांचा समावेश आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.