Mohan Bhagwat Solapur Tour : सरसंघचालक मोहन भागवत सोलापुरात; संभाजी ब्रिगेड, मराठा कार्यकर्त्यांना पोलिसांनी ठेवले नजरकैदेत...

Sambhaji Brigade, Maratha activists detained Police : मोहन भागवत आज सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत. अक्कलकोटमध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर शाई फेकून हल्ला करण्यात आला हेाता. त्यामुळे पोलिसांनी सोलापूर शहरात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
Mohan Bhagwat
Mohan BhagwatSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 17 July : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे आज (ता. 17 जुलै) सोलापूर दौऱ्यावर आहेत. त्या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेड आणि सकल मराठा समाजाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संभाजी ब्रिगडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे हल्ला झाला होता, त्यामुळे पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून ही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोटमध्ये शाई फेकून हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर हल्लेखोर दीपक काटे आणि त्याच्या साथीदाराच्या विरोधात संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. काटे हा भाजपशी संबंधित असल्याचा आरोप होत आहे, त्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या (Solapur) दौऱ्यावरआलेले मोहन भागवत यांच्या सुरक्षेच्या संदर्भात पोलिसांनी दक्षता घेतली आहे.

उद्योगवर्धिनी संस्थेच्या वर्धापनदिनाच्या परिवार उत्सव या कार्यक्रमासाठी मोहन भागवत (Mohan Bhagwat ) हे आज सोलापुरात आले आहेत. भागवत यांचा सोलापुरात हुतात्मा स्मृती मंदिरात कार्यक्रम होत आहे. त्या कार्यक्रमाला फक्त निमंत्रितांनाच प्रवेश देण्यात येत आहे. सोलापूर शहरात मोहन भागवत यांच्या ये-जा करण्याच्या मार्गावर कडकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. चौकाचौकात चार चार पोलिस उभे आहेत.

संभाजी बिग्रेडच्या कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहेत. त्या लक्षात घेऊन पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये संभाजी ब्रिगेडच्या सर्व प्रमुख कार्यकर्त्याना पोलिसांनी पहाटेपासून ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी या कार्यकर्त्यांचे मोबाईलही काढून घेतले आहेत. मराठा आंदोलक आणि बहुजन समाजातील आंदोलनाची पार्श्वभूमी असणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे

Mohan Bhagwat
Kolhapur Politics : कोल्हापूरमध्ये 'सोन्याच्या गावात' प्रचंड राजकीय गोंधळ; सरपंचाविरोतील अविश्वास ठरावावर ग्रामस्थांचं मतदान

संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले, वकील आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेश कदम, सोलापूर शहर कार्याध्यक्ष प्रशांत देशमुख, संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष अरविंद शेळके, शिरीष जगदाळे, शहर उपाध्यक्ष फिरोज सय्यद, जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप निंबाळकर, शेखर जगदाळे, सोमनाथ राऊत, सोहन लोंढे, मारुती सावंत यांना गुरुवारी (ता. १७ जुलै) पहाटेपासून पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची नावे आहेत.

Mohan Bhagwat
BJP Politics : भाजपची रणनिती ठरली ! निवडणुकीआधी मुख्यमंत्री फडणवीस आख्खा महाराष्ट्र पिंजून काढणार

मोहोळ तालुक्यातील कोथळे गावातील महेश पवार यांना गावातून ताब्यातच घेऊन कामती पोलिस पोलिस चौकीत आणून ठेवले. तसेच, कोंडी (ता. उत्तर सोलापूर) येथील संभाजी ब्रिगेडचे सोमनाथ राऊत यांना शहरातील फौजदार चावडी पोलिस ठाण्यात नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com