Satara Vanchit Aghadi News : ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, तर मोदी 'इंडिया'ला ठेवणार नाहीत...

Prakash Ambedkar वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज साताऱ्यात शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला.
Prakash Ambedkar, Narendra Modi
Prakash Ambedkar, Narendra Modisarkarnama

Satara Prakash Ambedkar News : वंचित आघाडीला इंडिया आघाडीत घेण्यास तयार नाहीत. त्यासाठी शरद पवारांचा की भाजपचा विरोध हे समजून घ्यायला हवे, असे सांगून आम्ही रयतेतील माणसांसाठी काम करतो. रयतेचा माणूस सत्तेत बसला तर आपली अडचण होईल, या भीतीपोटी ते आम्हाला इंडिया आघाडीत घेत नाहीत. या भूमिकेतून त्यांनी आम्हाला घेतले नाही तर मोदी 'इंडिया'ला ठेवणार नाही, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.

वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर Prakash Ambedkar यांनी आज साताऱ्यात शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. इंडिया आघाडीत India Aghadi सहभागी होणार का, या प्रश्नावर ते म्हणाले, इंडिया आघाडी शेवटपर्यंत टिकावी ही अपेक्षा आहे. वंचित आघाडी इंडियाचा घटक व्हावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

या आघाडीमध्ये आम्ही गेलो तर लोकांपुढे सत्य आलं पहिजे. इंडिया आघाडीच्या मुंबईतील बैठकीत राहुल गांधींनी अदानींची अर्थव्यवस्था देशाला धोकादायक आहे, अशी मांडणी केली होती. 'इंडिया'च्या सर्व लोकांनी याला पाठिंबा दिला. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आम्ही अदानींसोबत असल्याचे दाखवून दिले आहे. त्यामुळे अदानींवरून जे द्वंद्व सुरू आहे.

याबाबत राहुल गांधी जे धोक्याच्या अर्थव्यवस्थेसोबत आहेत, ते इंडिया आघाडीत राहू शकत नाहीत, अशी भूमिका घेतील का, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. हा विषय सुटला नाही तर मोदी याचा फायदा उठवू शकतात. त्यांना केंद्रात निर्णय घेणारा नेता हवा आहे. आम्हाला इंडिया आघाडीत घेण्यास तयार नाहीत.

Prakash Ambedkar, Narendra Modi
Satara ST News : साताऱ्यातील १७३ हून अधिक एसटी बस कालबाह्य; नवीन २०० बसची व्यवस्था करा : श्रीनिवास पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

आम्हाला आघाडीत घ्यायला शरद पवारांचा, की भाजपचा विरोध हे समजून घ्यायला हवे, असेही ते म्हणाले. आम्ही रयतेच्या माणसांसाठी काम करत आहोत. त्यामुळे रयतेचा माणूस सत्तेत बसला तर आपली अडचण होईल, या भीतीपोटी ते आम्हाला घेत नाहीत. या भूमिकेतून त्यांनी आम्हाला घेतले नाही तर मोदी इंडिया ठेवणार नाहीत, असा इशारा त्यांनी दिला.

Edited By Umesh Bambare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com