Rohit Patil : तब्बल 24 वर्षांनी तासगावात आमसभा, 9 तासात तक्रारींचा पाऊस, रोहित पाटलांचीही थेट तंबी

Rohit Patil Tasgaon General Mitting : तासगावात मतदारसंघात तब्बल 24 वर्षांनी आमसभा भरली. यावेळी ही सभा साडेनऊ तास चालली असून शासकीय अधिकाऱ्यांना अक्षरशः धारेवर धरण्यात आले.
Rohit Patil Tasgaon General Mitting
Rohit Patil Tasgaon General Mittingsarkarnama
Published on
Updated on

Sangli News : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळीला सुरूवात झाली आहे. जिल्ह्यात सर्वच गट-तट आणि राजकीय पक्ष कामाला लागले असून बैठकांचा जोर सुरू झाला आहे. याला तासगाव मतदारसंघ देखील अपवाद नसून आमदार रोहित पाटील यांनी तासगाव पंचायत समितीची आमसभा घेत राजकीय डाव टाकला आहे. तर ही आमसभा तब्बल 24 वर्षांनी झाल्याने तर 9 तास चाललल्याने वादळी ठरली. सध्या याचीच चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे.

तासगाव पंचायत समितीची आमसभा येथील परशुराम मंगल कार्यालयात तब्बल 24 वर्षांनंतर आमदार रोहित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. जी याआधी 2001 मध्ये झाली होती. सकाळी 11 वाजता सुरू झालेली ही सभा रात्री साडेआठपर्यंत म्हणजेच साडेनऊ तास चालली. यावेळी सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी आपला मोर्चा शासकीय अधिकाऱ्यांकडे वळवलेला दिसला. तर कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना अक्षरशः धारेवर धरत समस्या आणि तक्रारींचा पाऊसच पाडला.

तब्बल 24 वर्षांनंतर होणाऱ्या आमसभेत सत्ताधारी आणि विरोधक देखील एकत्र येणार असल्याने ती वादळी होण्याची शक्यता होती. यामुळे येथे आधीपासूनच तणावाचे वातावरण तयार झाले होते. अशा तणावातच सकाळी अकरा वाजता सभा सुरू झाली. सुरूवातीला शांततेत सुरू असणारी आमसभा विभागवार आढावा, उत्तरे आणि ऐन वेळचे प्रश्नांवरून तापली.

Rohit Patil Tasgaon General Mitting
Rohit patil : ठाकरे बंधूंचं ठरतानाच, पवार कुटुंबांमध्ये 'टाळी' वाजणार? रोहित पाटलांनीही घातली साद

सुरुवातीपासूनच विरोध आक्रमक झाले असतानाच यात सत्ताधारी आमदार गटाचे कार्यकर्त्यांची भर पडली. ज्यामुळेनंतर ग्रामीण रुग्णालय, आरोग्य विभाग, पंचायत समिती, एस. टी. महामंडळ, पोलिस, बाजार समिती, महसूल विभाग, पशू संवर्धन विभागावर प्रश्नांचा भडीमारा झाला. याच विभागांवर विरोधकांसह सत्ताधारी कार्यकर्त्यांनी अक्षरशः तक्रारींचा पाऊस पडत अधिकाऱ्यांना अक्षरशः धारेवर धरले. यामुळे अधिकारी निरुत्तर होताना दिसले. यावेळी मांडण्यात आलेल्या प्रश्नांकडे आणि सूचनांकडे आम्ही लक्ष देवू अशी ग्वाही रोहित पाटील यांनी दिली. तसेच विरोधकांनी मांडलेल्या प्रश्नांसाठी शासनाकडे पाठपुरावा करू, असेही आश्वासन रोहित पाटील यांनी यावेळी दिले.

रोहित पाटील यांनी, राजकीय नेते कोणत्याही अवैध धंदेवाल्यांना लायसन्स देत नाही, त्यांना पाठिशी घालत नाही. यामुळे आता तासगावात अवैध धंदेवाल्यांचे दिवस भरले असून त्यांचे समूळ उच्चाटन केले जाईल. तर हे उच्चाटन केल्याशिवाय आपण गप्प बसणार नाही, असेही त्यांनी इशारा दिला आहे.

अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

तब्बल 24 वर्षानंतर झालेल्या आमसभेत विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनी थेट अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. यामुळे अनेकांना उत्तर देखील देता आले नाही. यावेळी अन्न आणि औषध प्रशासनाचे अधिकारी न सांगता सभेतून निघून गेल्याचे उघडकीस आले. या प्रकारामुळे आमसभेमुळे तणाव निर्माण झाला. तर आमसभेवेळी न सांगताच निघून गेलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली.

Rohit Patil Tasgaon General Mitting
Rohit Pawar Vs Gulabrao Patil: मी सोन्याचा चमचा घेऊन, तर तुम्ही पानाला चुना लावत...; रोहित पवार अन् गुलाबरावांमध्ये पुन्हा शाब्दिक चकमक

यावेळी आमदार रोहित पाटील यांच्यासह गटविकास अधिकारी तथा आम सभेचे सचिव किशोर माने, तहसीलदार अतुल पाटोळे, पोलिस निरीक्षक सोमनाथ वाघ, पालिकेचे मुख्याधिकारी सुधाकर लेंडवे यांच्यासह आरोग्य विभाग, शिक्षण, राज्य परिवहन, वनविभाग, सामाजिक वनीकरण, कृषी विभाग, राज्य उत्पादन शुल्क, अन्न औषध प्रशासन, महावितरण, पाटबंधारे, बाजार समिती, यांच्यासह विविध शासकीय विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com