Kagal Election : घाटगेंसाठी मुश्रीफांना अंगावर घेतलं अन् आता त्यांनीच फसवलं : शरद पवारांचा पदाधिकारी फक्त रडायचाच बाकी!

Hasan Mushrif Samarjeet Ghatge Alliance : कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड पाठोपाठ कागल तालुक्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या आहेत.
Hasan Mushrif and Samarjit Ghatge surprised cadres by announcing a joint alliance for the Kagal Municipal Council
Hasan Mushrif and Samarjit Ghatge surprised cadres by announcing a joint alliance for the Kagal Municipal Councilsarkarnama
Published on
Updated on

kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल विधानसभा मतदारसंघातील एकमेकांचे कट्टर राजकीय वैरी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते समरजीत घाटगे हे एकत्र आल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. मात्र ह्या दोघांच्या युतीनंतर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीमध्ये उद्रेक होताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही बी पाटील यांनी घाटगेंवर थेट हल्ला चढवला आहे.

कागल मधील समरजित घाटगे यांच्या भूमिकेमुळे कोल्हापुरातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात उद्रेक झाला असून समरजीत घाटगे यांनी मुश्रीफ यांच्याशी आघाडी करून जनतेची आणि पक्षाची फसवणूक केल्याचा आरोप जिल्हाध्यक्ष व्हीबी पाटील यांनी केला आहे.

ही आघाडी दोन राष्ट्रवादीची नाही तर भाजप आणि राष्ट्रवादीची आघाडी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने ही आघाडी झालीय. समरजीत घाटगे आणि मुश्रीफ यांची आघाडी म्हणजे समरजित घाटगे यांचं भाजपच्या दिशेने जाण्याचं पहिलं पाऊल आहे.

Hasan Mushrif and Samarjit Ghatge surprised cadres by announcing a joint alliance for the Kagal Municipal Council
Samarjeet Singh Ghatge Vs Hasan Mushrif: एकमेकांचे कट्टर राजकीय वैरी घाटगे- मुश्रीफांची युती 'अदृश्य शक्ती'वरच अवलंबून राहणार!

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही बी पाटील यांनी समरजीत घाटगे यांच्या भूमिकेवर संताप व्यक्त करत हसन मुश्रीफ यांच्यासोबत आघाडी करणे ही समरजीत घाटगे यांची मोठी चूक आहे, असे म्हटले आहेत. समरजीत घाटगेंनी स्वतःच्या स्वार्थासाठी पक्षाला अंधारात ठेवून ही आघाडी केलीय, असाही आरोप त्यांनी केला आहे.

घाटगेंसाठी मुश्रीफांशी वैर

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी महायुतीत प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी पाटील यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावरच आरोप केले होते. इतकेच नव्हे तर विधानसभा निवडणुकीत घाटगे यांच्या प्रचारार्थ मुश्रीफ यांच्या विरोधात रान उठवले होते.

Hasan Mushrif and Samarjit Ghatge surprised cadres by announcing a joint alliance for the Kagal Municipal Council
Hasan Mushrif : कागल, मुरगूडमध्ये मुश्रीफांच्या विरोधात तगडी युती? समरजीत घाटगे डाव टाकण्याच्या तयारीत

कागल तालुक्यापूर्तीच राष्ट्रवादी मर्यादित ठेवली असा पाटील यांनी मुश्रीफ यांच्यावर आरोप केला होता. या सर्व घडामोडीनंतर पाटील आणि मुश्रीफ यांच्यात वैर निर्माण झाले होते. मात्र घाटगे यांच्या प्रवेशानंतर पाटील यांची प्रतिक्रिया घाटगे यांनी फसवणूक केल्याची होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com