Samarjeet Singh Ghatge Vs Hasan Mushrif: एकमेकांचे कट्टर राजकीय वैरी घाटगे- मुश्रीफांची युती 'अदृश्य शक्ती'वरच अवलंबून राहणार!

Kolhapur Politics: कागल तालुक्यातील दोन कट्टर राजकीय विरोधक एकत्र आल्यानंतर मंगळवारी(ता.18) दोघांचीही पत्रकार परिषद पार पडली. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीत घाटगे तब्बल वीस वर्षांनी एकत्र येत युतीची घोषणा केली.
Samarjeet Singh Ghatge Hasan Mushrif .jpg
Samarjeet Singh Ghatge Hasan Mushrif .jpgSarkarnama
Published on
Updated on

Kagal News: कागल तालुक्यातील दोन कट्टर राजकीय विरोधक एकत्र आल्यानंतर मंगळवारी(ता.18) दोघांचीही पत्रकार परिषद पार पडली. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीत घाटगे (Samarjeet Singh Ghatge) तब्बल वीस वर्षांनी एकत्र येत युतीची घोषणा केली. या पत्रकार परिषदेमध्ये वरिष्ठांची सविस्तर चर्चा झाली.

या चर्चेनंतरच घाडगे आणि मुश्रीफ यांच्यातील युती झाली. भविष्याच्या राजकारणात आम्ही एकत्र मिळून राजकारण करू. एकत्र राहण्यासाठीच एकत्र आलो आहोत. जर या अदृश्य शक्तीचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असेल, तर आमची युती कायम राहील असा खुलासा शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीत घाटगे आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.

समरजीत घाटगे म्हणाले, वरिष्ठ पातळीवर मीटिंग झाली, युती होण्यासाठी प्रयत्न झाले. दोन महिने अगोदर बैठक झाली असा गैरसमज कार्यकर्त्यांमध्ये आहे. कार्यकर्त्यांनी तो गैरसमज दूर करावा. मागील चोवीस तासात बैठक झाली. वरिष्ठांनी केलेल्या चर्चेनुसारच ही युती झाली आहे. मुरगूड व कागलचा विकास म्हणून आम्ही एकत्र आलो आहोत. दोन्ही नगरपालिका मध्ये आम्ही एकत्र काम करणार आहोत, असेही स्पष्टीकरण घाटगे यांनी दिले.

जी ताकद एकमेकांविरोधात वापरत होतो, ती विकासकामांमध्ये वापरली पाहिजे, असे आमचे मत झाले. कोणत्याही कार्यकर्त्यावर अन्याय होऊ देणार नाही. आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा एकत्र काम करूया. आमच्या दोघांमध्ये समजूतदारपणा आहे. सत्तेसाठी युती नाही, हा विकासाठी युती आहे. अदृश्य शक्तीचा हात आशीर्वाद राहिला तर युती कायम टिकेल. असा विश्वास समरजीत घाटगे यांनी व्यक्त केला.

Samarjeet Singh Ghatge Hasan Mushrif .jpg
Mahayuti Decision : जमीन वादानंतर विविध प्राधिकरणांकडील भुखंडाच्या वापराबाबत मोठा निर्णय; मंत्रिमंडळात शिक्कामोर्तब

स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याची मुभा शरद पवार यांनी दिली होती. आघाडीबद्दल आम्ही परवानगी घेऊन दिली होती. स्पष्ट करत असताना घाटगे आणि हसन मुश्रीफ(Hasan Mushrif) यांनी वरिष्ठ व्यक्ती कोण होती याबाबत स्पष्ट खुलासा केलेला नाही.

समरजीत घाटगे यांनी जी भूमिका मांडली तीच आमची भूमिका आहे. युती कशी झाली त्याची माहिती त्यांनी दिली. अचानक झालेली युती ही कार्यकर्त्यांना पटलेली नाही, पण त्यांची माफी मागितली आहे. आपली सर्वांची जबाबदारी आहे की सर्वांना कसे मताधिक्य मिळेल, कोणावर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.

Samarjeet Singh Ghatge Hasan Mushrif .jpg
MCA Election: अजित पवारांचं अध्यक्ष तर मोहोळांचं उपाध्यक्षपद धोक्यात! क्रीडा संघटनेची कोर्टात धाव

भविष्यकाळात ज्यांनी पाठिंबा दिला आहे, त्यांना संधी दिली जाईल.आम्ही एकत्र आलोय हे एकत्र राहण्यासाठी आलो आहोत. आता आम्ही आता युतीतील घटक आहोत. असे म्हणत घाटगे यांच्या भाजप प्रवेशाचे संकेत मंत्री मुश्रीफ यांनी दिले आहेत.

मंडलिक यांनी अस्वस्थ होणे आवश्यक नव्हते. कागल शहरात त्याचा सहभाग नव्हता. लोकसभेत आम्ही मदत केली नाही असे म्हणाले, पण देव साक्षीला आहे. आता संजय मंडलिक अस्वस्थ होऊन चालणार नाही.त्यांना काय बोलायचं हे सुचत नाही,अशी टीका मंत्री मुश्रीफ यांनी माजी खासदार संजय मंडलिक यांच्यावर केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com