Covid Infection to Shambhuraj Desai: भुजबळांनंतर मंत्री शंभूराज देसाई यांनाही कोरोनाची लागण

Chhagan Bhujbal : सक्रिय रुग्णांचा आकडा 10 हजारांवर
Shambhuraj Desai
Shambhuraj DesaiSarkarnama
Published on
Updated on

Covid News : गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा कोरोना डोकं वर काढू लागला आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना पाहायला मिळत आहे. दरम्यान, मंगळवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर सायंकाळी मंत्री शंभुराज देसाई यांनाही कोरोनाची लागण झाली माहिती त्यांनी स्वतः दिली आहे.

शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी फेसबुक पोस्ट लिहीत कोविडची लागणी झाल्याची माहिती दिली. खबरदारी म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने शंभूराजेवर उपचार सुरू आहेत. तसेचा त्यांना गृहविलगीकरणात राहण्याचा सल्ला दिला आहे.

याबाबत मंत्री देसाई म्हणाले, माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी गृह विलगीकरणात डॉक्टरांकडून उपचार घेत आहे. माझी प्रकृती ठीक असून काळजी करण्याचे कारण नाही. गेल्या तीन-चार दिवसांमध्ये माझ्या प्रत्यक्ष संपर्कात आलेल्यांनी त्यांना काही लक्षणे आढळल्यास त्वरित कोविड चाचणी करून घ्यावी, ही विनंती आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन यानिमित्ताने करतो."

Shambhuraj Desai
Rahul Gandhi Said Sorry : राहुल गांधी म्हणतात माफी मागत नाही; मग हे काय ? घ्या पुरावे !

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे येवला दौऱ्यावर आले होते. तेथील नियोजित कार्यक्रम आटोपून ते नाशिकला परतत असतानाच त्यांना थंडी, ताप आला होता. यामुळे त्यांना उपचारासाठी दाखल केले होते. डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणी केल्या आणि यांना डिस्चार्ज दिला होता. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशननंतर छगन भुजबळ(Chhagan Bhujbal) हे आजारी पडले होते.त्यांना सोमवारी ताप आल्यानंतर त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. यात भुजबळ यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं निष्पन्न झाले आहे.

Shambhuraj Desai
Agasti Sugar Factory Election : अगस्ती कारखान्याच्या उपाध्यक्षपदासाठी 'या' नावांची चर्चा; सुनीता भांगरेंना मिळणार का संधी?

देशात XBB.1.16 व्हेरियंटचे रुग्ण अधिक

देशात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. सध्या देशात XBB.1.16 व्हेरियंटचे रुग्ण अधिक आढळत असल्याने वाढत्या कोरोना रुग्ण संख्येचं कारण हा व्हेरियंटच असल्याचं मानलं जात आहे. देशात कोरोनाच्या XBB.1.16 व्हेरियंटचे आतापर्यंत 610 रुग्ण आढळले आहेत. या व्हेरियंटचा 11 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात शिरकाव झाला आहे.

Shambhuraj Desai
PCMC News : सहाय्यक पोलीस आयुक्तावर साडेबारा लाखांच्या खंडणीचा गुन्हा

सक्रिय रुग्णांचा आकडा 10 हजारांवर

देशातील रुग्णसंख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत भारतात कोरोनाचे 1805 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर कोरोनाच्या सक्रिय रुग्णांचा आकडा 10 हजारांच्या पुढे पोहोचला आहे. सध्या देशात 10 हजार 300 कोरोना रुग्ण उपचाराधीन आहेत. महाराष्ट्रात कोविडचा प्रादुर्भाव झपाट्यानं वाढत आहे. ऑक्‍टोबरनंतर प्रथमच सक्रिय प्रकरणांचा आकडा २ हजारच्या वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासात 123 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. ही चिंताजनक बाब आहे. मुंबईतील रुग्णालयांमध्ये 43 कोरोना रुग्ण दाखल आहेत. यापैकी 21 जणांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. मुंबईत कोविडच्या सक्रिय रुग्णांची संख्या 500 च्या पुढे गेली आहे. अशा परिस्थितीत पुन्हा कोविड वॉर्ड सुरू करण्यात येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com