BJP-Shivsena Conflict : ठाण्यानंतर आता माढ्यातही महायुतीत धुसफूस; शिंदे गटातल्या नेत्याचा भाजपला इशारा!

BJP-Shivsena Conflict : आमच्याकडून सहकार्याची अपेक्षा ठेवू नये..
BJP-Shivsena Conflict :  Sanjay Kokate
BJP-Shivsena Conflict : Sanjay KokateSarkarnama
Published on
Updated on

Solapur Politics : कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजप आणि शिंदे गटात आगामी निवडणुकीत जागेच्या दाव्यावरून वाद चव्हाट्यावर आला होता. आता शिवसेना शिंदे गटाचे नते सोलापूर माढा लोकसभा मतदारसंघ प्रमुख संजय कोकाटे (Sanjay Kokate) यांनी भाजपला सुनावले आहे. सोलापुरातील भाजपा-शिवसेनेला (BJP-Shivsena Conflict ) वाद त्यांनी समोर आणला आहे. या मतदारसंघात फक्त भाजपचीच कामे होतात,असा आरोप त्यांनी केला. फेसबुकवर व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी असे आरोप केले.

BJP-Shivsena Conflict :  Sanjay Kokate
Raut Vs Rane : राऊतांनी ठोकला अब्रु-नुकसानीचा दावा, राणे-राऊत लढाई आता कोर्टात; 'या' तारखेला सुनावणी!

कोकाटे म्हणाले, "कल्याणमध्ये भाजपने शिवसेनेला सहकार्य करणार नसल्याचा ठराव केला आहे. भाजपच्या या भूमिकेचा मी निषेध करतो. त्यांनी हे लक्षात ठेवावं की, एकनाथ शिंदेंमुळे तुम्ही सत्तेत आहात. सोलापूरमध्येही भाजपचा खूप अन्याय सहन केला. पालकमंत्री पद देत नाहीत. संजय गांधी निराधार योजनांवर समित्यांची नेमणूक झाली. कोणतीही कामे केली जात नाहीत. फक्त भाजपचीच कामे करा, असा अलिखित आदेश प्रशासनला दिले गेले आहेत.

BJP-Shivsena Conflict :  Sanjay Kokate
Ambadas Danve On Amit Saha News : आम्ही हिंदुत्व सोडलं म्हणणाऱ्या भाजपने फारूख, मेहबुबाशी युती करून कोणतं हिंदुत्व साधलं..

"एवढं सगळं आम्ही सहन करतो, माढा लोकसभे अक्षरश: जीवाचं रान करून ३५-३० वर्षांचा अन्याय पाहूनही येथे भाजापाचा खासदार आम्ही निवडून आणला. पण भाजपची आतली गटबाजीमुळे ज्यांचा पत्करून आ्मही मदत केली. आता त्यांना बरोबर घेऊन त्यांना ताकद दिली जाते. त्यांना आज बरोबर घेऊन कदाचित भाजपाची आतली बंडाळी मिटेल. पण शिवसेना आणि मि्त्र पक्ष तुमचा प्रचार करतील असं वाटत नाही. आम्हाला कसलीही अपेक्षा नाही. ज्यांच्या विरोधात काम केंल, त्यांनाच सोबत घेऊन फिरणार असाल तर आमच्याकडूनही अपेक्षा ठवू नका," असा थेट इशारा संजय कोकाटे यांनी दिला.

BJP-Shivsena Conflict :  Sanjay Kokate
Shrikant Shinde News : क्षुल्लक बदलीवरून युतीत कुणी आव्हान देऊ नये; श्रीकांत शिंदेनी सांगितला मध्यम मार्ग

ठाण्यातही वाद -

ठाण्यातही भाजप आणि शिंदे गटात आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने वाद उफाळून आला होता. यावर खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन केले होते. "नरेंद्र मोदी यांना २०२४ ला पंतप्रधान करण्यासाठी युतीत एकत्र काम करणे गरजेचे आहे. कल्याणमधून कुणी निवडणूक लढवायची याबाबत युतीतील वरिष्ठ नेते ठरवील. मात्र एखाद्या क्षुल्लक कारणावरून कुणी थेट उमेदवार ठरवण्याची भाषा करून आव्हान देऊ नये, असे आवाहन खासदार श्रीकांत शिंदे यांनी मंत्री रवींद्र चव्हाण यांना नाव न घेता केले आहे. (Latest Marathi News)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com