Raut Vs Rane : राऊतांनी ठोकला अब्रु-नुकसानीचा दावा, राणे-राऊत लढाई आता कोर्टात; 'या' तारखेला सुनावणी!

Sanjay Raut Vs Nitesh Rane : राणेंना न्यायालयात यासंबंधी आपले म्हणणे मांडावे लागणार आहे.
Sanjay Raut Vs Nitesh Rane :
Sanjay Raut Vs Nitesh Rane :Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मागील अनेक दिवसांपासून शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) आणि भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यात आरोप-प्रत्यारोप, वार-प्रतिवार होत आहेत. राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली की त्याला तातडीने प्रत्युत्तर देण्यासाठी नितेश राणे यांची पत्रकार परिषद घेऊन राऊतांवर टीका करत आहेत. मात्र ही शाब्दीक टोलवाटोलवी आता उच्च न्यायालयाच्या पायरीवर येऊन पोहचली आहे. राऊत यांनी थेट राणेंवर अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे. (Sanjay Raut defamation claim nitesh Rane)

Sanjay Raut Vs Nitesh Rane :
नितेश राणे असं बोलले की सगळेच आश्चर्यात पडले | Nitesh Rane | BJP |Maharashtra | Sarkarnama | #shorts

राऊत यांच्याकडून भाजप आमदार नितेश राणे यांना अब्रुनुकसानीची नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यानुसार ४ जुलै रोजी यावर दाव्यावर सुनावणी पार पडणार आहे. यामुळे आता राऊत यांनी राणेंना कायदेशीर कचाट्यात पकडले असून, राणेंना न्यायालयात यासंबंधी आपले म्हणणे मांडावे लागणार आहे. मात्र आता राऊतांना राणेंना कायदेशीर पाऊल उचलल्यानंतर भाजपचे काही नेते आणि शिंदे गटाच्या नेत्यांकडून असेच दावे राऊतांविरोधात दाखल करतील अशी माहिती मिळत आहे.

Sanjay Raut Vs Nitesh Rane :
Mrs. Mukhyamantri In Maharashtra : महाराष्ट्राच्या आजपर्यंतच्या मिसेस मुख्यमंत्री

नितेश राणे यांच्या विरोधात युवा सेनेचे नेते राहुल कनाल यांनीसुद्धा दावा दाखल केला होता. संजय राऊत यांच्यावर यापूर्वी किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी अशाच प्रकारचा दावा राऊंतावर केला होता. यामुळे एकूण राजकीय टीका-टिपण्णीचा घसरलेली परिस्थिती पाहता, असे अनेक अब्रुनुकसानींचा दावा वाढण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com