नवाब मलिकांना अटक झाली अन् जंयत पाटलांची धावपळ उडाली!

राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीने अटक केली.
Jayant Patil
Jayant PatilSarkarnama
Published on: 
Updated on: 

करमाळा : राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीने अटक केली. विरोधी पक्षाकडून सुडाचे राजकारण सुरु आहे. ही गंभीर बाब आहे. त्यामुळे 'राष्ट्रवादीची परिवार संवाद' यात्रा गुरुवारी (ता. 24) एक दिवस स्थगित केली जाणार आहे, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी करमाळ्यात सांगितले आहे. पाटील इंदापूरला जाणार होते. मात्र, तातडीने मुंबईला रवाना झाले.

Jayant Patil
भाजपमध्ये जाण्यासाठी माझ्यावरही दबाव होता; जयंत पाटलांचा गोप्यस्पोट

नवाब मलिक यांना ईडीने बुधवारी (ता. 23) सकाळी चौकशीसाठी नेले. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. मलिक यांना न्यायालयात हजर केले त्यांना आठ दिवसांची ईडी (ED) कोठडी सुनावण्यात आली. त्यावरुन राष्ट्रवादीच्या कर्यकर्त्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. गडचिरोली जिल्ह्यातून ही परिवार संवाद यात्रा सुरु झाला होती. मात्र, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे ही यात्रा स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर यात्रा सुरु झाली मात्र, मलिक यांना अटक झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सर्व मंत्र्यांना मुंबईत येण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पाटील हे मुंबईत दाखल झाले. त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली.

Jayant Patil
आमदार संजयमामा तुम्ही अपक्ष म्हणत बसु नका; आता थेट राष्ट्रवादीत या! 

मंत्री पाटील म्हणाले, केंद्रीय यंत्रणेचा गैरवापर केला जात आहे. एका मंत्र्याला कोणतीही पूर्व सूचना न देता चौकशीसाठी नेले जाते आणि सर्व सहकार्य करूनही त्यांना अटक केली जाते. हे दुर्दैवी आहे, असे ते म्हणाले. मलिक यांनी ड्रग्ज प्रकरणात त्यांना मिळालेली अचूक माहिती माध्यमांना दिली. विरोधी पक्षाकडून सरकारमधील मंत्र्यांना नामोहरण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. आज सकाळी 50 पोलिसांना घेऊन ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशीला नेले. आठ तास चौकशी करून त्यांना अटक केली. याबाबत कोणाला काही कळवले नाही, असेही पाटील यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.