Phaltan : वाजपेयींनंतर भाजपमध्ये थोर नेते जयकुमार गोरेच....रामराजेंचा टोला

कोरेगावच्या koregaon कॉरिडॉर एमआयडीसीबाबतचा Corridor MIDC निर्णय हा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण Nirmala Shitaraman यांनी घेतला आहे. राज्याची व केंद्राची एमआयडीसी MIDC हे वेगवेगळे प्रकल्प असतात.
Ramraje Naik Nimbalkar, Jaykumar Gore
Ramraje Naik Nimbalkar, Jaykumar Goresarkarnama

फलटण : तालुक्यांचे राजकारण आपण चांगल्यांच्या हातात दिलं नाही, तर पूर्वीचे दिवस यायला वेळ लागणार नाही. सद्य परिस्थितीत भारतीय जनता पक्षात वाजपेयींनंतर जर कोणी थोर नेते असतील तर, ते म्हणजे आदरणीय जयकुमार गोरेच असतील, असा टोला विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आमदार गोरे यांना लगावला.

फलटण येथील अनंत मंगल कार्यालयात महादेव पोकळे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश कार्यक्रमात रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी आमदार दीपक चव्हाण, रघुनाथराजे नाईक निंबाळकर, संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Ramraje Naik Nimbalkar, Jaykumar Gore
भ्रष्टाचार सिद्ध झाला तर कडेलोट करा... पण, यात्रेत पिपाणी वाजविल्यासारखे करू नका... उदयनराजे


रामराजे म्हणाले, जिल्ह्यामध्ये काम करून घ्यायची पद्धत आपण सुरू केली. दिल्लीत गेल्यावर यशवंतराव चव्हाण यांचाच जिल्हा म्हणून आपल्या जिल्ह्याला ओळखले जाते, अशा ह्या जिल्ह्यात आता कोणत्या प्रकारचे नेते तयार होत आहेत, हे नागरिकांनी उघड्या डोळ्यांनी पाहणे गरजेचे आहे. कार्यकर्त्यांना विकासाची व प्रश्नांची जाण असली पाहिजे. गटात असावे किंवा नसावे पण, सर्वसामान्यांची कामे करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच कायम तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभा होता व ह्या पुढेही असेल.

Ramraje Naik Nimbalkar, Jaykumar Gore
'रामराजे, जयकुमार गोरे यांचा जनतेला वेडे बनवण्याचा व्यवसाय!'

गटात असावे किंवा नसावे पण, सर्वसामान्यांची कामे करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच कायम तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभा होता व ह्या पुढेही असेल. रामराजे म्हणाले, 
आज महादेव पोकळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला आहे. ते यापूर्वी खासदार गटामध्ये कार्यरत होते. खासदार यांच्या कार्यपद्धतीनुसार आगामी काळामध्ये तालुक्यातील खासदारांच्या गटामध्ये खासदार स्वतः व त्यांचे बंधू समशेरसिंह नाईक निंबाळकरच शिल्लक राहतील. त्यांचे बाकीचे कार्यकर्ते हे आपल्याकडे येतील किंवा घरी बसतील, असा टोला त्यांनी लगावला.

Ramraje Naik Nimbalkar, Jaykumar Gore
धमक असेल तर MIDC कोरेगावला नेऊन दाखवा... जयकुमार गोरेंचे रामराजेंना प्रतिआव्हान

मागील काही दिवसांपूर्वी आदरणीय गोरे साहेब म्हणत होते की, आता ह्या उतरत्या वयात नातवंडासोबत बसा. मी नातवंडासोबत बसू शकतो, परंतू मला त्यांना एक विचारायचे आहे की, तुम्हाला मुल व संसार किती हे स्पष्ट करा आणि मग नातवंडे किती हे सांगा. सातारा जिल्ह्याचे असल्या या लोकांमुळे नाव खराब होत आहे. गोरे व खासदार हे दुक्कल मुंबई मधील ट्रायडंट हॉटेलमध्ये बसून असतात. तिथूनच जिल्ह्यासह तालुक्यातील अधिकाऱ्यांवर दबाव टाकत असतात.

Ramraje Naik Nimbalkar, Jaykumar Gore
MIDC : आमदार गोरेंमुळेच म्हसवडची एमआयडीसी कोरेगावला स्थलांतरीत.... रामराजे

कोरेगावच्या कॉरिडॉर एमआयडीसीबाबतचा निर्णय हा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी घेतला आहे. राज्याची व केंद्राची एमआयडीसी हे वेगवेगळे प्रकल्प असतात. त्यामध्ये म्हसवडला सुद्धा एमआयडीसी होवू शकते. फलटणला राज्याचीच एमआयडीसी आहे. परंतू फलटणला आंतरराष्ट्रीय प्रकल्प सुरु आहेतच ना, असेही यावेळी रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले. 


Ramraje Naik Nimbalkar, Jaykumar Gore
म्हसवड 'एमआयडीसी'ला माझा विरोध कधीच नव्हता : रामराजे

खासदारांचा धंदा एकच आहे तो म्हणजे नवं, जुनं करणं. आपल्या तालुक्यातील नागरिकांना माहित नसेल परंतू किचनमधील मिक्सर किंवा इतर अवजारे दुरूस्त करायचा डिप्लोमा कदाचित माझ्याकडून डिप्लोमाचं नाव चुकत असेल हे खासदारांचे शिक्षण झालं आहे. खासदारांचे कुठं शिक्षण झाले हेच शोधायला पाहिजे. आता तालुक्यामध्ये तडीपारीची केस फक्त राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांवरच का, असा प्रश्न करून ते म्हणाले, सत्तेचा गैरवापर करण्याचे काम सध्या चालु आहे. असे काही केले तरी व खासदारांनी कितीही ठरवले तरी तालुक्यातील नागरिकांचे मनपरिवर्तन करण्यात ते कधीही यशस्वी होणार नाहीत, असेही रामराजे यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com