अपघातग्रस्तांसाठी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ठरले देवदूत

राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) हे नियोजित विविध कार्यक्रमानिमित्त अहमदनगरमध्ये आले होते.
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe PatilSarkarnama
Published on
Updated on

Radhakrishna Vikhe Patil : राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) हे नियोजित विविध कार्यक्रमानिमित्त अहमदनगरमध्ये आले होते. सायंकाळी सर्व कार्यक्रम उरकून ते सोनई मार्गे प्रवरा लोणी येथे निघाले होते. त्यावेळी त्यांना अपघातात जखमी नागरिक दिसून आले. त्यांनी वाहनांचा ताफा थांबवत अपघातग्रस्तांना तातडीने वैद्यकीय मदत पुरवली. या अपघातग्रस्तांसाठी ते देवदूत ठरले.

अहमदनगर शहरातील नियोजत कार्यक्रम झाल्यावर मंत्री विखे पाटील हे सोनई मार्गे प्रवरा लोणीच्या दिशेने निघाले. त्यांच्या वाहनाचा ताफा पांढरीपुलाच्या नजिक आला. त्यावेळी त्यांना रस्त्यावर चारचाकी व दुचाकीचा अपघात झाल्याचे कळाले. त्यांनी त्यांच्या वाहनांचा ताफा थांबविला. आज ( शनिवारी ) रात्री सव्वा आठ वाजता हा अपघात झाला होता.

Radhakrishna Vikhe Patil
राधाकृष्ण विखेंनी अशोक चव्हाणांचे केले भाजपत स्वागत : नाना पटोलेंना दिल्या कानपिचक्या

वाहनातून उतरून अपघात झालेल्या वाहनांची पाहणी केली. अपघातग्रस्तांची विचारपूस केली. प्रशासनाला तातडीने अपघातग्रस्तांना मदत करण्याचे आदेश दिले. त्यानुसार अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळाली. त्यामुळे विखे पाटील या अपघातग्रस्तांसाठी देवदूतच ठरले.

Radhakrishna Vikhe Patil
संघर्षशील नेतृत्व महाराष्ट्राने गमावले : राधाकृष्ण विखे पाटलांची शोक संवेदना

अपघात होताच परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. रस्त्यावरच अपघात झाल्याने वाहतूक कोंडी झाली होती. मंत्री विखे पाटलांनी पुढाकार घेत वाहतूक सुरळीत केली. त्यानंतर ते सोनई मार्गे प्रवरा लोणीच्या दिशेने मार्गस्थ झाले. मंत्री विखे पाटील यांच्यामुळे अपघातातील जखमी वेळेत अहमदनगरमधील रुग्णालयात दाखल होऊन त्यांच्यावर उपचार सुरू झाल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले. वांजोळी ग्रामस्थ व पांढरीपूल व्यावसायिकांनी या मदत कार्याचे स्वागत केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com