Manikrao Kokate News : कृषिमंत्री कोकाटे यांना कोल्हापुरात येण्यास विरोध, पोलिस-स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की

Kolhapur Politics Swabhimani Shetkari Sanghatna News : स्वाभिमानीच्या इशाऱ्यानंतर शासकीय विश्रामगृहाबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवला होता.
Kolhapur Protest
Kolhapur ProtestSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : शेतकऱ्यांच्या बाबतीत चुकीचे वक्तव्य करणाऱ्या आणि भिकारी संबोधणाऱ्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना कोल्हापूर दौऱ्यावर येण्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विरोध केला आहे. शेतकऱ्यांची माफी मागावी मगच कोल्हापुरात यावे, अशी मागणी करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने  शासकीय विश्रामगृहाबाहेर आंदोलनाचा इशारा दिला होता.

स्वाभिमानीच्या इशाऱ्यानंतर शासकीय विश्रामगृहाबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवला होता. आंदोलनाच्या तयारीत असणाऱ्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यावेळी मोठी झटापट आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये झाली. पोलिसांकडून धक्काबुक्की होत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला.

Kolhapur Protest
Girish Mahajan Politics: शिक्षा कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंना, त्याचे बक्षीस गिरीश महाजन यांना मिळेल का?

दरम्यान, बळाचा वापर करत पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. कोकाटे यांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या वक्तव्यावर माफी मागावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि जिल्हाध्यक्ष अजित पोवार यांनी केली होती. आज कृषी मंत्री एक वाजता कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर शासकीय विश्रामगृहाबाहेर तगडा पोलीस बंदोबस्त तैण्यात करण्यात आला आहे. येणाऱ्या जाणाऱ्यांची कसून चौकशी केली जात आहे.

विश्रामगृहाबाहेर आंदोलनाच्या तयारीत असणाऱ्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी पोलिसांनी विचारपूस केली. यावेळी आपण आंदोलन करत नसल्याची भूमिका पदाधिकाऱ्यांनी मांडली. मात्र पोलिसांनी पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेला गृहीत न धरतात थेट कॉलर पकडत पोलिस व्हॅन मध्ये नेले. यावेळी आंदोलक शेतकऱ्यांनी रस्त्यावरच ठिया मारला.

Kolhapur Protest
Vijay Wadettiwar : राहुल गांधींची खासदारकी 24 तासांत रद्द, माणिकराव कोकाटेंना अभय का? विधानसभा अध्यक्षांवर काँग्रेस नेते संतापले

कृषिमंत्री कोकाटे यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी, अशी घोषणा यावेळी देण्यात आली. पोलिस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये धक्काबुक्कीचा प्रकार घडला. दरम्यान, माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. कालच त्यांना 30 वर्षांपूर्वीच्या एका फसवणुकीच्या प्रकरणात कोर्टाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे.

कोकाटे यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सुनील केदार यांना लावलेला नियम कोकाटेंनाही लावावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com