Ahmednagar District Bank : नगर बँकेचं राजकारण तापलं; थोरात गट आक्रमक अन् सत्ताधारी विखे गटाची माघार, 107 कोटींचं...

Balasaheb Thorat Vs Radhakrushna Vikhe Patil : 107 कोटी रुपयांसाठी सह्यांची मोहीम...
Balasaheb Thorat Vs Radhakrushna Vikhe Patil
Balasaheb Thorat Vs Radhakrushna Vikhe Patil Sarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar District Bank News : लोकसभेच्या निवडणुका जस-जशा जवळ येऊ लागल्या आहेत, तसे नगर जिल्ह्यातील विखे-थोरात गटाचे एकमेकांवर कुरघोडीच्या राजकारणाला वेग आला आहे. नगर जिल्हा सहकारी बँकेतदेखील या दोन गटांचे राजकारण संचालक मंडळाच्या बैठकीत दिसले. बैठकीत थोरात गट आक्रमक झाल्याने 107 कोटी रुपये खर्चाच्या डेटा सेंटर आणि संगणकप्रणाली खरेदीच्या विषयाला स्थगिती द्यावी लागली. नगर जिल्हा बँकेत विखे गटाची सत्ता असली तरी थोरात गटाच्या वरचष्मा असल्याचे दिसते आहे. (Latest Marathi News)

Balasaheb Thorat Vs Radhakrushna Vikhe Patil
Nagar Urban Bank : नगर अर्बन बँक ठेवीदारांच्या 'आसूड' मोर्चाला सामोरे जाताना भाजपच्या सुवेंद्र गांधींची दमछाक

नगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची काल बैठक झाली. या बैठकपूर्वीच थोरात गटाच्या दहा संचालकांनी 107 कोटी रुपये खर्चाच्या डेटा सेंटर आणि संगणकप्रणालीच्या विषयाला हरकतीचे पत्र दिले. थोरात गटाच्या संचालकांनी पत्रात नगर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीकडे लक्ष वेधले होते.

दुष्काळामुळे बँकेच्या वसुलीवर परिणाम झाला आहे. ऊस कमी असल्यामुळे यावर्षी गळीत हंगामदेखील कारखानदारांना आव्हानात्मक आहे. त्यामुळे गळीत हंगाम किती दिवस चालेले हे सांगता येणार नाही. या सर्वाचा परिणाम बँकेच्या अर्थकारणावर होणार आहे. यातच इतक्या मोठ्या रकमेच्या खरेदीची गरज आहे का? असा प्रश्न थोरात गटाने पत्रात उपस्थित केला. तसेच बँकेच्या 'सीडी रेशो'चे उल्लंघन होत असल्याकडेदेखील थोरात गटाने लक्ष वेधले.

Balasaheb Thorat Vs Radhakrushna Vikhe Patil
Pathardi Politics : मंजूर रस्ता रोखणारा भाजपचा नेता कोण; प्रांताधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनानंतर नगरमध्ये चर्चा

थोरात गटाचा हा आक्रमकपणा जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांच्यासह विखे गटाला शह देणारा ठरला आहे. या 107 कोटी रुपयांच्या विषयासाठी थोरात गटाने नगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळामध्ये सह्यांची मोहीम राबवली. त्यामुळे संगणकीकरणाचा विषय विखे गटाने स्थगित ठेवला. नगर जिल्हा सहकारीबँकेत थोरात गट आक्रमक झाल्याने सहमतीच्या राजकारणालादेखील तडा गेला आहे.

थोरात गटाकडे बहुमत असूनदेखील फेब्रुवारी महिन्यात अध्यक्षपदाच्या निवडणुकीत थोरात गटाचे पाच संचालक विखे गटाने फोडले. शिवाजी कर्डिले यांनी बँकेची निवडणूक थोरात गटाकडून लढवली आणि ते विखे गटाकडून बँकेच्या अध्यक्षपदी विराजमान झाले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे चंद्रशेखर घुले यांना पराभव पत्कारावा लागला. यानंतर थोरात गट काहीसा शांत राहून बँकेतील राजकारणावर लक्ष ठेवून होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, आमदार प्राजक्त तनपुरे यांनी नगर जिल्हा बँकेतील आर्थिक शिस्तीवर काही दिवसांपूर्वी बोट ठेवले होते. जिल्हा बँकेत उधळपट्टी सुरू आहे, असा त्यांनी आरोप केला होता. तसेच खरेदीबद्दलदेखील संशय व्यक्त केला होता. यानंतर काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरातांनीदेखील जिल्हा बँकेतील आर्थिक बेशिस्तीवर भाष्य केले. यानंतर मात्र थोरात गट बँकेतील आर्थिक मुद्द्यांवर चांगलाच आक्रमक झाला.

Balasaheb Thorat Vs Radhakrushna Vikhe Patil
जळगाव जिल्हा बॅक राष्ट्रवादीकडे आली अन् पवारांनी दिला हा सल्ला

थोरात गटाचे नऊ संचालक आणि विखे गटाकडील माजी आमदार मुरकुटे अशा दहा संचालकांनी डेटा सेंटर आणि संगणक खरेदी विरोधात संचालक मंडळाच्या बैठकीपूर्वी सह्यांचे पत्र दिले. परिणामी सत्ताधारी विखे गटाला या विषयाला स्थगिती द्यावी लागली. थोरात गटाची ही अध्यक्ष शिवाजी कर्डिले आणि विखे गटाला शह असल्याने बोलले जात आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com