Ahmednagar Politics : मंत्री विखे, आमदार कानडेंविरुद्ध भानुदास मुरकुटे 'या' मुद्द्यावर संघर्षाच्या तयारीत...

Bhanudas Murkute News : ....यासाठी वेळप्रसंगी आंदोलनाचीदेखील तयारी
Bhanudas Murkute
Bhanudas MurkuteSarkarnama
Published on
Updated on

प्रदीप पेंढारे-

Ahmednagar News : भाजप सत्ताकाळात नगर जिल्ह्यात उत्तर आणि दक्षिण नगर, असा वाद सुरू झाला आहे. पंतप्रधानांपासून ते केंद्र,राज्यातील प्रमुख नेत्यांचेदेखील उत्तरेत दौरे वाढलेत. शिर्डी येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय सुरू झाल्यापासून नगर जिल्ह्याचे विभाजन अटळ असल्याचे सांगितले जात आहे.

नगर जिल्ह्याचे विभाजनानंतर नगर उत्तरमध्ये मुख्यालय कोठे असेल, हादेखील वादाचा मुद्दा बनला आहे. माजी आमदार भानुदास मुरकुटे(Bhanudas Murkute) यांनी श्रीरामपूर तालुका मुख्यालय व्हावा, यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्याविरुद्ध संघर्षाची तयारी, तर श्रीरामपूर तालुक्यातील विद्यमान आमदार लहू कानडे यांना कोपरखळ्या मारल्या आहेत.

Bhanudas Murkute
Reshma Bhosale News : अनिल भोसलेंच्या पत्नी रेश्मा भोसले यांना तोतया 'ईडी' अधिकाऱ्याने मागितली खंडणी!

माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी अशोक कारखान्याच्या गळीत हंगामानंतर पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी नगर उत्तरेतील मुख्यालय कोणता तालुका असावा, यावर भाष्य केले. मुरकुटे म्हणाले, "श्रीरामपूर तालुका हा नगर उत्तरेत जिल्हा मुख्यालयाच्या निकषावर योग्य आहे. या मागणीसाठी आपला पहिल्यापासून पाठिंबा आहे.

मात्र, आपण राजकीयदृष्ट्या कमी पडतो. आमदारकीची सत्ता नाही. आमदार असतो, तर एकाही कार्यालयाची पळवापळव होऊ दिली नसती. श्रीरामपूर मुख्यालय व्हावे, यासाठी वेळप्रसंगी आंदोलनाचीदेखील तयारी असल्याचे माजी आमदार मुरकुटे यांनी म्हटले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

श्रीरामपूर जिल्हा व्हावा, यासाठी संघर्षाची तयारी माजी आमदार मुरकुटे यांनी केली आहे. मुरकुटे यांना हा संघर्ष थेट दिग्गज नेते मंत्री राधाकृष्ण विखेंविरुद्ध (Radhakrishna Vikhe Patil) करावा लागणार आहे. मुरकुटे यांचे मंत्री विखेंना अप्रत्यक्ष आव्हान म्हणजे, आगामी काळातील राजकीय भूमिकेची चाचपणी आहे. तसेच मुरकुटे यांनी आमदरकीची सत्ता नाही. असतो, तर कार्यालयाची पळवापळवी करून दिली नसती, असे म्हटले आहे.

यावरून कार्यालयाच्या पळवापळवीत रोख मंत्री विखेंकडेच जातो, तर आमदार लहू कानडे (Lahu Kanade) यांची चुप्पीच्या भूमिकेवरही मुरकुटे यांनी निशाणा साधला आहे. म्हणजेच एका दगडात दोन पक्षी मुरकुटे यांनी वेधण्याचा प्रयत्न केला आहे.

मराठा समाजाला आरक्षण आवश्यकच

मराठा समाज हा सधन असल्याचा गैरसमज आहे. मात्र, वास्तव वेगळे आहे. मराठा समाज हा शेतीवर अवलंबून आहे. निसर्गाशी जोडला गेलाय. त्यामुळे मराठा समाज हा नेहमीच विवंचनेत असतो. शेतीवर अवलंबून असणाऱ्या या मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, अशीही भूमिका माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी मांडली.

(Edited By Deepak Kulkarni)

Bhanudas Murkute
Reshma Bhosale News : अनिल भोसलेंच्या पत्नी रेश्मा भोसले यांना तोतया 'ईडी' अधिकाऱ्याने मागितली खंडणी!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com