Nagar Urban Bank : नगर अर्बन बँक ठेवीदारांच्या 'आसूड' मोर्चाला सामोरे जाताना भाजपच्या सुवेंद्र गांधींची दमछाक

Ahmedanagar Political News : नगर अर्बन बँकेच्या संचालकांनी ठेवीदारांच्या पैशांवर डल्ला मारला.
Nagar Urban Bank
Nagar Urban Bank Sarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar : रिझर्व्ह बॅंकेने परवाना रद्द केलेल्या नगर अर्बन बॅंकेच्या ठेवीदारांनी भाजपचे दिवंगत माजी खासदार तथा अर्बनचे तत्कालीन चेअरमन दिलीप गांधी यांच्या बंगल्यावर आसूड मोर्चा नेत अडचणी मांडल्या. अर्बनच्या सत्ताधारी सहकारी पॅनलचे नेतृत्व करणारे सुवेंद्र गांधी हे ठेवीदारांच्या मोर्चाला सामोरे गेले. यावेळी त्यांची ठेवीदारांना उत्तर देताना चांगलीच दमछाक झाली. यानंतर मोर्चा पोलीस अधीक्षक कार्यालयात येवून लुटारूंवर कारवाई करण्याची मागणी केली.

नगर अर्बन बँकेच्या (Nagar Urban Bank) संचालकांनी ठेवीदारांच्या पैशांवर डल्ला मारला. अफरातफर केली. त्यांच्या गैरकारभारामुळे नगर अर्बन बँक बंद पडली. खोटी वसुली दाखवली गेली. त्यामुळे एनपीए वाढला. ठेवीदारांनी मोठ्या विश्वासाने पैसे ठेवले होते. मात्र, चिल्लर घोटाळा, बनावट सोने तारण घोटाळा, सस्पेन्स अकाउंट घोटाळा, बोगस कर्ज वाटप अशा घोटाळ्यांमुळे बँक अडचणीत आली.

Nagar Urban Bank
Anjali Damania : भुजबळांची तक्रार घेऊन दमानिया मुख्यमंत्री शिंदेंच्या दरबारात ; म्हणाल्या...

परवाना रद्द झाल्याने आता ठेवीदारांना हक्काचे पैसे मिळेनात. त्यामुळे या लुटारूंवर कारवाई झालीच पाहिजे, मोर्चातील ठेवीदारांनी केली. आंदोलनकर्त्या ठेवीदारांनी आसूड उगारून यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मोर्चात सहभागी झालेले माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी देखील स्वतःवर आसूड उगारले.

बंगल्यावर आलेल्या मोर्चाला सुवेंद्र गांधी(Suvendra Gandhi) सामोरे गेले. ठेवीदारांना ठेवी परत मिळाव्यात व बँक पुन्हा सुरू व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. थकीत वसुलीसाठी आमचे प्रयत्न सुरू असतानाच रिझर्व्ह बँकेने परवाना रद्द केला. त्यामुळे अडचण झाली, अशी भूमिका त्यांनी मांडली. ठेवीदारांनी मात्र, गाधींना चांगलेच सुनावले. आम्हाला आमच्या ठेवी व खात्यात अडकलेले पैसे पाहिजेत. बँक सुरू होणार किंवा नाही, हे सांगू नका. आम्ही दोन वर्षे तुमचे ऐकले. आता आम्ही किती दिवस थांबायचे, असा सवाल ठेवीदारांनी आक्रमक भूमिका घेतली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

घोषणाबाजी झाल्यानंतर मोर्चा पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे रवाना झाला. पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर निदर्शने करून घोषणाबाजी करण्यात आली. ठेवीदारांनी स्वतःवर आसूड ओढत आंदोलन केले.

अपर अधीक्षक प्रशांत खैरे, उपअधीक्षक अनिल कातकाडे, कमलाकर जाधव यांनी शिष्टमंडळाशी चर्चा केली. बँक लुटारूवर अद्यापही कारवाई न केल्याने पोलिस प्रशासनाचा निषेध करण्यात आला. बँक घोटाळ्या प्रकरणी दाखल गुन्ह्यांचे फॉरेन्सिक ऑडिट सुरू आहे. त्याचा अहवाल अद्यापही मिळाला नाही. पोलिसांनी तत्काळ दोषी संचालक, त्यांचे साथीदार व कर्जदारांवर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. अपर अधीक्षक खैरे यांनी फॉरेन्सिक ऑडिट करणाऱ्या संस्थेशी संपर्क साधला असून, उद्या (गुरुवारी) ऑडिट रिपोर्ट दिला जाईल, असे त्यांनी सांगितले.

Nagar Urban Bank
Dilip Walse Patil - Shetti : "...म्हणून 'स्वाभिमानी'ने आंदोलन मागे घ्यावे!"; मंत्री वळसे पाटलांची शेट्टींना विनंती

नगर अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे लेखी म्हणणे प्रमाणे बँकेत ठेवीदारांना ठेवी परत देण्याइतपत निधी उपलब्ध आहे. तरी तो आम्हाला उपलब्ध करुन देण्याचे आदेश पारित करण्यात यावे. अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. उद्योजक राजेंद्र चोपडा, मनोज गुंदेचा, संजय झिंजे, नाना देशमुख ,अच्युतराव पिंगळे, महेश जेवरे, गंगाधर पावसारे, सुमन जाधव, उषा कोतकर, सूर्यकांत सोनूकेवळ आदींसह जवळपास शेकडो ठेवीदार मोर्चात सहभागी झाले होते.

"'एमपीआयडी'नुसार कारवाई करा!"

अर्बन बॅंकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी दोषी संचालकांवर एमपीआयडी म्हणजेच ठेवीदार संरक्षण कायद्यानुसार गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी केली. ठेवीदार संरक्षण कायद्यानुसार कारवाई करण्याबाबत माहिती घेऊन दोन दिवसात कार्यवाही केली जाईल,असे आश्वासन अपर अधीक्षक प्रशांत खैरे यांनी दिले.

Nagar Urban Bank
Ajit Pawar : केंद्राचा निधी मिळवण्यासाठी अजित पवारांचा मोठा निर्णय, म्हणाले...

मात्र, प्रत्येक ठेवीदारांची स्वतंत्र फिर्याद घेऊन स्वतंत्र गुन्हा दाखल करणे शक्य नाही.एकदा एमपीआयडी लागला की, सर्वच ठेवीदारांना न्याय मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.रिझर्व्ह बँकेचे निर्बंध,परवाना रद्द करण्याचे निर्देश याची तपासणी करा व ठेवीदार संरक्षण कायद्यानुसार कारवाई करा,अशा सूचना खैरे यांनी आर्थिक गुन्हे शाखेला दिल्या.

(Edited By Deepak Kulkarni)

Nagar Urban Bank
Tanpure Sugar Factory : तनपुरे कारखान्यावरील जिल्हा बँकेच्या ताब्याविरोधात शेतकरी संघटना आक्रमक!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com