Amit Thackeray : अमित ठाकरेंच्या दौऱ्यातच अहमदनगर 'मनसे'तील दुही आली समोर

Ahmednagar MNS News अमित यांच्या स्वागताच्या फ्लेक्सवर जिल्हा सचिवांचा फोटोच नाही
MNS Banner in Ahmednagar
MNS Banner in Ahmednagar Sarkarnama
Published on
Updated on

राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवानेते अमित ठाकरे शनिवारी, रविवारी अहमदनगर दौऱ्यावर आहेत. या दोन दिवसांत अमित शहर आणि शिर्डीला भेट देणार आहेत. ठाकरे यांच्या या दौऱ्याची नगर जिल्ह्यात जोरदार तयारी सुरू असतानाच मनसेत नवा वाद होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. अमित यांच्या स्वागताच्या फलकांवर मनसेचे जिल्हा सचिव नितीन भुतारे यांचा फोटो दिसत नाही. त्यामुळे अमित यांच्या पहिल्या दौऱ्यातच नगर मनसेत दोन गट असल्याचे स्पष्ट झाले आहे. (Latest Political News)

अमित ठाकरे हे प्रथमच नगर जिल्हा दौर्यावर येत असल्याने नगर शहरात प्रमुख रस्त्यांवर ठिकठिकाणी स्वागताचे होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. या होर्डिंग्जवर जाणीवपूर्वक फोटो छापला नसल्याने नितीन भुतारे नाराज असल्याचे बोलले जात आहे. भुतारे यांनी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी यांच्या एकूण कामकाजबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. शहरात विविध मुद्यांवर आंदोलनाचे आक्रमक अयोजनाबद्दल भुतारे ओळखले जातात.

MNS Banner in Ahmednagar
Tukaram Munde Transfer : तुकाराम मुंडे आता धनंजय मुंडेंच्या खात्यात; दोन्ही मुंडेंची साथ टिकणार का ?

आपला होर्डिंग्जवर फोटो नसल्याबद्दल तक्रार नाही, असे सांगत भुतारे यांनी पदाधिकाऱ्यांच्या कार्यशैलीवर आक्षेप घेतला. जिल्ह्यातील परिस्थितीचा माहिती आपण मनसे प्रमुख राज ठाकरे आणि नेते बाळा नांदगावकर यांची भेट घेऊन देणार असल्याचेही भुतारे यांनी सांगितले. कोविड काळात आपण कोट्यवधी रुपयांचे रुग्णालयाचे बिले परत मिळवून दिली आहेत. यातून मला मिळत असलेल्या प्रसिद्धीमुळे आपल्याला डावलण्याचा प्रयत्न होत असल्याची तक्रार भुतारे यांची आहे.

MNS Banner in Ahmednagar
IAS Officers Transfer : पुणे जिल्हा परिषदेच्या आयुष प्रसाद यांच्यासह ४१ अधिकाऱ्यांच्या बदल्या; आता पुण्याची धुरा कुणाकडे ?

आता महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष म्हणून अमित ठाकरे यांचा आठव्या टप्प्यातील उत्तर महाराष्ट्र दौऱ्यात मनविसेची पुनर्बांधणी करणार आहेत. यावेळी अमित नगर शहरात २२ जुलै रोजी तर शिर्डी येथे २३ जुलै रोजी असणार आहेत. त्यांच्या दौऱ्याची जय्यत तयारी केली असल्याचे मनविसेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी सांगितले.

वर्मा म्हणाले, "अमित ठाकरे यांच्या दौऱ्याचा प्रमुख उद्देश महाविद्यालयीन युवकांशी संवाद साधणे हा आहे. नगरमधील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांची मते जाणून घेण्याचा हेतू आहे. राज्याच्या राजकारणात कोणते बदल झाले पाहिजे, तसेच सामाजिक स्तरावर युवकांचे काय प्रश्न आहेत, कोणत्या मागण्या आहेत, ते जाणून घेतले जाईल. त्या दृष्टीने संवाद मेळाव्याचे सर्व नियोजन आहे."

MNS Banner in Ahmednagar
Shahajibapu Patil News : करोडो रुपयांचा निधी आणतोय असं सांगणाऱ्या शहाजीबापूंच्या सांगोल्यात ठाकरेंच्या शिलेदाराकडून पाण्याचा टॅंकर !

असे आहे अमित यांचे नियोजन ?

अमित ठाकरे हे छत्रपती संभाजीनगर येथून सकाळी आठ वाजता नगरच्या दिशेने निघतील. नेवासा तालुक्यातील शनिशिंगणापूर येथे दहा वाजता शनी मूर्तीचे दर्शन घेतील. यानंतर ते नगरच्या दिशेने रवाना हाेतील. नगर तालुक्यातील शेंडी बायपास येथे साडेअकरा वाजता मनविसे पदाधिकारी त्यांचे भव्य स्वागत करणार आहेत.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com