Mumbai News : राज्यातील तब्बल ४१ सनदी अधिकाऱ्यांच्या ऐन पावसाळी अधिवेशनात बदल्या करण्यात आल्या आहेत. याबाबत सरकारने शुक्रवारी परिपत्रक जारी केले आहे. यात आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे यांच्यासह पुणे जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आयुष प्रसाद यांचीही बदली करण्यात आली आहे. आयुष प्रसाद यांची बदली झाल्याने त्यांच्या जागी आता महसूल व वन विभागाचे सहसचिव रमेश चव्हाण याची नेमणूक करण्यात आलेली आहे. (Latest Political Marathi News)
कुणाची कुठं झाली बदली ?
१. राजेंद्र शंकर क्षीरसागर : मुख्य सचिव कार्यालयाचे सहसचिव, मंत्रालय, मुंबई पदावरून मुंबई शहर मुंबई जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आहे.
२. वर्षा ठाकूर-घुगे : मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नांदेड पदावरून लातूर जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.
३. संजय चव्हाण : मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर पदावरून मुंबई अतिरिक्त मुद्रांक नियंत्रक म्हणून बदली झाली.
४. आयुष प्रसाद : मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे पदावरून जळगाव जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती केली.
५. बुवनेश्वरी एस : मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, धुळे पदावरून वाशिमचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली.
६. अजित कुंभार : सह आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका पदावरून अकोला जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली.
७. डॉ. श्रीकृष्णनाथ बी. पांचाळ: मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, यवतमाळ पदावरून जालना जिल्हाधिकारी म्हणून नियुक् केली.
८. डॉ. पंकज आशिया : मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव पदावरून यवतमाळ जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती.
९. कुमार आशीर्वाद : मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गडचिरोली पदावरून सोलापूर जिल्हाधिकारी म्हणून बदली.
१०. अभिनव गोयल : मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, लातूर पदावरून धुळे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती. (Officer Transfer News)
११. सौरभ कटियार : मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अकोला पदावरून अमरावती जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती.
१२. तृप्ती धोडमिसे : प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी धुळे यांची सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती.
१३. अंकित : प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी अहेरी, गडचिरोली यांची जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती.
१४. शुभम गुप्ता : प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी अटापली एसडीओ, पो.भारमरागड, आयटीडीपी, गडचिरोली यांची धुळे झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती.
१५. मीनल करनवाल : प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी, आयटीडीपी, नंदुरबार यांची नांदेड झेडपीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती.
१६. डॉ. मैनाक घोष : प्रकल्प अधिकारी, आयटीडीपी, गडचिरोली-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी, गडचिरोली यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, झेडपी, यवतमाळ म्हणून नियुक्ती.
१७. मनीषा माणिकराव आव्हाळे : प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी, आयटीडीपी, सोलापूर यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, झेडपी, सोलापूर म्हणून नियुक्ती.
१८. सावन कुमार : प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी, धारणी, आयटीडीपी अमरावती यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, झेडपी नंदुरबार म्हणून नियुक्ती.
१९. अनमोल सागर : सहाय्यक जिल्हाधिकारी, देवरी उपविभाग, गोंदिया यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, झेडपी, लातूर म्हणून नियुक्ती.
२०. आयुषी सिंह : प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी, जव्हार, आयटीडीपी, पालघर यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, झेडपी, गडचिरोली म्हणून नियुक्ती.
२१. वैष्णवी बीव : सहायक जिल्हाधिकारी, तुमसर उपविभाग, भंडारा यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. अकोला येथे नियुक्ती.
२२. पवनीत कौर : जिल्हाधिकारी, अमरावती यांची संचालक, जीएसडीए, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
२३. गंगाथरण डी : जिल्हाधिकारी, नाशिक यांची बृहन्मुंबई महानगरपालिका सह आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली.
२४. अमोल जगन्नाथ येडगे : जिल्हाधिकारी, यवतमाळ यांची महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद, पुणे म्हणून नियुक्ती.
२५. शनमुगराजन एस : जिल्हाधिकारी, वाशिम यांची अतिरिक्त विकास आयुक्त (उद्योग), मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली.
२६. विजय चंद्रकांत राठोड : जिल्हाधिकारी, जालना यांची सह मुख्य कार्यकारी अधिकारी, एमआयडीसी मुंबई म्हणून नियुक्ती.
२७. निमा अरोरा : जिल्हाधिकारी अकोला यांची संचालक, माहिती तंत्रज्ञान, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
२८. वैभव दासू वाघमारे : यांची प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी, अहेरी, गडचिरोली म्हणून नियुक्ती केली आहे.
२९. संतोष सी. पाटील : उपमुख्यमंत्र्यांचे सहसचिव यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, झेडपी, कोल्हापूर म्हणून नियुक्ती केली.
३०. आर.के.गावडे : मुख्य कार्यकारी अधिकारी, झेडपी, नंदुरबार यांची जिल्हाधिकारी, परभणी म्हणून नियुक्ती केली आहे.
३१. आंचल गोयल : जिल्हाधिकारी, परभणी यांना अतिरिक्त महापालिका आयुक्त, नागपूर महानगरपालिका, नागपूर म्हणून नियुक्त केले आहे.
३२. संजय खंदारे : मुख्य सचिव, पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
३३. तुकाराम मुंढे : सचिव, मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई यांची सचिव, कृषी आणि एडीएफ विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती केली.
३४. जलज शर्मा : जिल्हाधिकारी धुळे यांची जिल्हाधिकारी, नाशिक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे
३५. डॉ. ए.एन.करंजकर : आयुक्त, ईएस्आयएस, मुंबई यांची महापालिका आयुक्त, नाशिक महानगरपालिका, नाशिक म्हणून नियुक्ती केली.
३६.आर.एस.चव्हाण : सहसचिव, महसूल आणि वन विभाग, मंत्रालय, मुंबई यांची मुख्य कार्यकारी कार्यालयात नियुक्ती केली आहे.
३७. रुचेश जयवंशी : यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, एनआरएलएम, मुंबई म्हणून नियुक्ती केली आहे.
३८. पृथ्वीराज बी.पी : जिल्हाधिकारी, लातूर यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी, नागपूर म्हणून नियुक्ती केली आहे.
३९. मिलिंद शंभरकर : जिल्हाधिकारी, सोलापूर यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, महात्मा फुले जन आरोग्य योजना सोसायटी, राज्य आरोग्य विमा संस्था, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
४०. मकरंद देशमुख – उपायुक्त (महसूल), कोकण विभाग, मुंबई यांची सहसचिव, मुख्य सचिव कार्यालय, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती केली आहे.
४१. डॉ. बी.एन.बस्तेवाड : मुख्य महाव्यवस्थापक, मुंबई यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, झेडपी रायगड म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.