Ahmednagar News : गुन्हेगारी रोखण्यासाठी भाजप खासदार मैदानात ; अहमदनगरमध्ये..

MP Sujay Vikhe : राधाकृष्ण विखे यांच्या प्रयत्नातून आणि पाठपुराव्याने हे काम केले जात आहे.
Ahmednagar News
Ahmednagar News Sarkarnama
Published on
Updated on

-राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar : नगर जिल्हा सध्या विविध गंभीर गुन्ह्यांच्या घटनांमुळेही चर्चेत आहे. एकूणच जिल्ह्यात आणि अहमदनगर शहरांमध्ये गुन्हेगारी वाढत असून गंभीर घटनांच्या नोंदी रोजच्या रोज होताना दिसते. मोठ्या क्षेत्रफळ असलेल्या या जिल्ह्यात अवैध व्यवसाय, गुन्ह्यांची संख्याही त्याच प्रमाणात मोठी आहे. यावर पोलिसांनी उपाययोजना करण्यास प्रारंभ केला आहे.

शहरातील वाहतूक नियंत्रण, सोनसाखळी चोरी, अवैध व्यवसाय, अवैध वस्तूंची वाहतूक, संवेदनशील ठिकाणे आदींच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसविण्यास सुरवात केली आहे. यामुळे या सर्वांवर २४ तास लक्ष ठेवणे शक्य होणार आहे, असे खासदार सुजय विखे आणि पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी सांगितले.

Ahmednagar News
Fadnavis Vs Thackeray : तुमचे ‘नड्डे’ केव्हा सैल होतील, हे समजणार देखील नाही ; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार ; बघूच आता..

शहरातील गुन्हेगारीवर वचक ठेवण्यासाठी 185 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. मागील 15 दिवसापासून याची चाचणी सुरू केली आहे. तसेच शहरातील 51 चौकातील वाहतुकीचे नियंत्रण आता कंट्रोल रूम मधून होणार आहे. 125 कॅमेरे सध्या कार्यरत करण्यात आले आहे.

भविष्यात 700 सीसीटीव्ही कॅमेरे हे शहर आणि उपनगरातील मोक्याच्या ठिकाणी बसवले जाणार आहेत. तसेच नगर जिल्ह्यातील सर्वच तालुक्याची शहरे, मोठ्या लोकवस्तीची गावे या ठिकाणीही पुढील तीन महिन्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत.पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या प्रयत्नातून आणि पाठपुराव्याने हे काम केले जात आहे.

Ahmednagar News
Thackeray Attack on Nadda : उद्धव ठाकरे बोलले की यांचा 'नड्डा' सुटतो ; ठाकरेंचा हल्लाबोल

छत्रपती संभाजी नगर येथील एका खाजगी कंपनीने सीसीटीव्ही सिस्टीम बसवली असून अत्याधुनिक अल्फा रेड कॅमेरे असल्याने रात्रीच्या अंधारात सुद्धा रंगीत व्हिडीओ रेकॉर्डिंग होणार आहे. तसेच प्रत्येक सीसीटीव्ही कमेऱ्याला स्पीकर सिस्टिम असून त्याद्वारे गरज असल्यास नागरिकांना सूचना दिल्या जाऊ शकणार आहेत.

यावेळी सुजय विखे यांना नगर शहर आणि जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी बद्दल विचारले असता त्यांनी, सीसीटीव्ही सिस्टिम च्या माध्यमातून पोलिसांना यावर अधिकचे नियंत्रण ठेवता येणार असून त्याचा परिणाम म्हणून गुन्हेगारीवर बराचसा आळा बसेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com