Solapur Politic's : अगोदर तिकीट कोणाचे..? भाजप उमेदवारीचे की सोलापूरच्या विमानसेवेचे...?

Loksabha Election 2024 : सिद्धेश्‍वर साखर कारखान्याची चिमणी पडली, धर्मराज काडादी सुटले, भाजप शब्दांत अडकला
Dharmraj Kadadi-MP Dr. Jaysiddeshwar Mahaswami
Dharmraj Kadadi-MP Dr. Jaysiddeshwar MahaswamiSarkarnama
Published on
Updated on

Solapur News : माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूरसाठी काय केले? असा प्रश्‍न विचारत भाजपने २०१४ आणि २०१९ ची सोलापूर लोकसभा निवडणूक जिंकली. सुरुवातीला शरद बनसोडे आणि आता डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी या भाजपच्या दोन खासदारांनी आतापर्यंत (२०१४ ते २०२३) काय केले? असा प्रश्‍न सोलापूरकर विचारू लागले आहेत. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील २०२४ चा भाजपचा उमेदवार कोण? याची प्रचंड उत्सुकता आहे. भाजपकडून उमेदवारीचे तिकीट जाहीर करण्यापूर्वी सोलापुरातून विमानसेवेचे तिकीट सोलापूरकरांच्या हाती दिले, तरच भाजपला आगामी निवडणूक सोपी जाण्याची शक्यता आहे. (Airline service issue will be a problem for Solapur BJP)

लिंगायत समाजासह सोलापूर परिसरातील विविध समाजाची अस्मिता म्हणून सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची ओळख आहे. या कारखान्याच्या चिमणीमुळे सोलापुरातील होटगी रोडवरील विमान तळावरून विमानसेवा सुरू होत नाही, हा वर्षानुवर्षे सुरू असलेला दावा/आरोप १५ जून २०२३ रोजी थांबला. हजारो शेतकऱ्यांची, कामगारांची रोजी रोटी असलेल्या या कारखान्याची चिमणी महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या नेतृत्वाखाली पाडण्यात आली.

सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी पडली अन् विकासाला अडसर ठरल्याच्या आरोपातून कारखान्याचे प्रमुख धर्मराज काडादी सुटले. चिमणी पडली, काडादी सुटले; परंतु २०२४ च्या लोकसभा मतदानापूर्वी सोलापुरातून विमानसेवा सुरू करून दाखविण्यासाठी राज्य व केंद्रातील सत्ताधारी भाजप आता पुरते अडकल्याचे दिसत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Dharmraj Kadadi-MP Dr. Jaysiddeshwar Mahaswami
BJP Vs Congress : सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेस नेत्यांना साताऱ्यात फिरू देणार नाही; भाजप आक्रमक

चिमणी पाडायची कोणी? जिल्हाधिकाऱ्यांनी की महापालिका आयुक्तांनी याच प्रश्‍नाचे उत्तर अनेक वर्षे सुटत नव्हते. माजी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडून हा विषय अखेर महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांच्याकडे आला, त्यांनी १५ जून रोजी चिमणी पाडून दाखविली. होटगी रोड विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्यासाठी १५ जून ते नोव्हेंबर अखेरपर्यंत फक्त चर्चा, बैठका आणि फायलींची फिरवाफिरवी एवढ्याच गोष्टी झाल्या.

लोकसभा निवडणुकीपूर्वी होटगी रोडवरून विमान उडले नाही, तर कारखान्याच्या सभासदांना/सोलापूरकरांना काय उत्तर देणार? याची जाणीव झाल्याने आता सोलापूरचे भाजप खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, आमदार विजयकुमार देशमुख यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधी युद्धपातळीवर तयारीला लागले आहेत.

लोकसभेचे तिकीट हे सोलापुरातील विमानसेवेच्या तिकिटावर अवलंबून दिसत आहे. नोव्हेंबरअखेर सुरू झालेली कामे पूर्ण होण्यासाठी निविदेत ८ ते ९ महिन्यांचा कालावधी दिला आहे. ही कामे सहा महिन्यांत संपविण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. महत्त्वाची कामे पूर्ण करून तीन महिन्यांत (खासदारकीच्या मतदानापूर्वी) विमानसेवा सुरू करण्यासाठी खासदार महास्वामी प्रयत्नशील आहेत. विमानसेवेचा परवाना मिळविणे, विमानसेवा देण्यास कंपन्या तयार करणे, सोलापूरकरांना सोईस्कर असलेल्या वेळेत व सोईस्कर असलेल्या ठिकाणापर्यंत सोलापुरातून विमानसेवा सुरू करण्याचे मोठे आव्हान सध्या सत्ताधारी भाजपसमोर आहे.

Dharmraj Kadadi-MP Dr. Jaysiddeshwar Mahaswami
Assembly Winter Session : जयंतरावांचा ‘पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन’अन्‌ अजितदादांचे उत्तर; विधानसभेत काय घडलं पहा...

माढ्याची उमेदवारी चर्चा; सोलापूरबाबत शांतता

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुण्यात माढ्यातील उमेदवारीचे अप्रत्यक्ष संकेत दिले आहेत. देशातील टॉप टेन खासदारांमध्ये निंबाळकर आहेत, त्यांना परत संधी दिल्यास ते २०१९ पेक्षा दुप्पट मताधिक्याने विजयी होतील, असा विश्‍वास त्यांनी माध्यमांसमोर बोलताना व्यक्त केला. माढ्याच्या उमेदवारीचे संकेत भाजपने दिले आहेत. सोलापुरातील उमेदवार मात्र गुलदस्त्यात आहे. खासदार महास्वामींच्या जात प्रमाणपत्राचा प्रलंबित विषय असतानाही शेवटच्या टप्प्यात विमानसेवेसाठी अचानक घेतलेला पुढाकार, माजी खासदार साबळेंचे वाढलेले सोलापूरवरील लक्ष, माजी खासदार शरद बनसोडे यांना भेटण्यासाठी मतदारसंघातून जाणारे कार्यकर्ते, यामुळे सोलापुरातील भाजपच्या उमेदवारीबद्दल प्रचंड उत्सुकता आहे.

चिमणी पाडूनही काडादींची ऊसदरात आघाडी

कारखान्याची चिमणी पाडल्यानंतरही कारखान्याचे प्रमुख धर्मराज काडादी यांनी शांततेच्या मार्गाने, तंत्रज्ञानाच्या साह्याने कारखाना सुरू केला आहे. त्यासाठी दहा कोटींच्या आसपास खर्च आला आहे. या परिसरातील इतर कारखान्यांपेक्षा जास्तीचा ऊसदर काडादी यांनी जाहीर केला आहे.

Dharmraj Kadadi-MP Dr. Jaysiddeshwar Mahaswami
Winter Session 2023 : वडेट्टीवारांनी सरकारची लाज काढली; 'एक अन्‌ दोन रुपये पीकविमा वाटता अन्‌...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com