BJP Vs Congress : सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेस नेत्यांना साताऱ्यात फिरू देणार नाही; भाजप आक्रमक

Veer Savarkar News : सावरकरांचा अपमान करणाऱ्या काॅंग्रेससोबत मांडीला- मांडी लावून बसायला आपल्याला शोभतं का?
 Satara BJP Leader
Satara BJP Leader Sarkarnama
Published on
Updated on

Satara News : कर्नाटकचे मंत्री प्रियांक खर्गे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात अवमानजनक विधान केल्यानंतर भारतीय जनता पक्ष राज्यात आक्रमक झाला आहे. खर्गे यांच्या विरोधात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहेत. साताऱ्यात काॅंग्रेसच्या नेत्यांना फिरू न देण्याचा इशारा भाजपकडून देण्यात आला आहे. (Congress leaders will not be allowed to roam in Satara : BJP aggressive)

दरम्यान, सावरकरांचा वारंवार अपमान करणाऱ्या काँग्रेस पक्षाचा समावेश असलेल्या महाविकास आघाडीतून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बाहेर पडावे, अशी मागणीही केली जाऊ लागली आहे.  त्यामुळे खर्गे यांच्या विधानावरून ठाकरेंना पुन्हा टार्गेट करण्यात येत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

 Satara BJP Leader
Priyank Kharge Statement : सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसला जनता धडा शिकवेल; खर्गेंविरोधात भाजप आक्रमक

सातारा शहरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने सातारा शहरातील पोवई नाका येथे जोरदार निदर्शने करण्यात आली. सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी यांनी काॅंग्रेसच्या नेत्यांना साताऱ्यात फिरू न देण्याचा इशारा या वेळी दिला आहे.

काँग्रेस अध्यक्ष मलिकार्जुन खर्गे यांचे सुपुत्र प्रियांक खर्गे यांनी ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांचे योगदान काय? त्यांचा पराक्रम काय? असा प्रश्न उपस्थित केला होता. अशा पद्धतीचे प्रश्न उपस्थित करून खर्गे यांनी संपूर्ण देशभक्तांचा घोर अपमान केला आहे. त्याचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो, असेही गोसावी यांनी म्हटले आहे. काँग्रेस आणि खर्गे यांच्या विरोधात या वेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

 Satara BJP Leader
Assembly Winter Session : जयंतरावांचा ‘पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन’अन्‌ अजितदादांचे उत्तर; विधानसभेत काय घडलं पहा...

काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणं उद्धव ठाकरेंना शोभतं का?

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा काॅंग्रेसकडून वारंवार अपमान केला जात आहे. महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे आहेत. काॅंग्रेस पक्ष सावरकरांचा आणि हिंदुत्वाचा अपमान करत आहे. तेव्हा आमचं उद्धव ठाकरे यांना विचारणं आहे, सावरकरांचा अपमान करणाऱ्या काॅंग्रेससोबत मांडीला मांडी लावून बसायला आपल्याला शोभतं का? तेव्हा काॅंग्रेसचा सहभाग असलेल्या महाविकास आघाडीतून आपण लवकरात लवकर बाहेर पडावं आणि स्वतःच अस्तित्व सिद्ध करावं, असे आवाहन भाजपचे शहराध्यक्ष विकास गोसावी यांनी केले आहे.

 Satara BJP Leader
Winter Session 2023 : वडेट्टीवारांनी सरकारची लाज काढली; 'एक अन्‌ दोन रुपये पीकविमा वाटता अन्‌...'

या आंदोलनावेळी जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, जिल्हा उपाध्यक्ष सचिन साळुंखे, मनीष महाडवाले, जिल्हा चिटणीस सुहास राजेशीर्के, चित्रपट आघाडी जिल्हाध्यक्ष विकास बनकर, नगरसेविका आशाताई पंडित यांच्यासह साताऱ्यात भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

 Satara BJP Leader
Nagpur winter session : शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री खोटे बोलत आहेत; नाना पटोले कडाडले

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com