Ajara Sugar Factory News: राज्यात नाही, पण कोल्हापुरात जमलं; भाजप-काँग्रेस-ठाकरे गटाची युती

Kolhapur Politics : आमदार विनय कोरे आणि आमदार सतेज पाटील यांच्यात झालेल्या चर्चेनंतर या आघाडीवर शिक्कामोर्तब झाले.
Ajara Sugar Factory News
Ajara Sugar Factory NewsSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur: आजरा साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी माघार घेतल्यानंतर या निवडणुकीच्या निमित्ताने अनोखी युती झाली आहे. राज्यात आजच्या घडीला जे शक्य नाही, जे कधीच होणार नव्हतं, अशी भलतीच युती आजरा कारखान्याच्या निवडणुकीत झाली आहे. भाजप, काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र आले आहेत. आमदार विनय कोरे आणि आमदार सतेज पाटील यांच्यात झालेल्या चर्चेनंतर या आघाडीवर शिक्कामोर्तब झाले. या चर्चेत मोठ्या वाटाघाटीही झाल्याची माहिती आहे.

आजरा सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक पुढील महिन्यात होत आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी सर्वच राजकीय पक्षांची भूमिका आहे. मात्र, अनेक गटातटांनी अर्ज दाखल केल्याने आजरा कारखान्याच्या निवडणुकीत काय होणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादीने या निवडणुकीतून माघार घेतल्याने सतेज पाटील व विनय कोरे यांनी आपापल्या संबंधित कार्यकर्त्यांशी चर्चा केली. शुक्रवार हा माघारीचा शेवटचा दिवस असून, शेवटच्या टप्प्यात उर्वरित इच्छुकांची काय भूमिका राहणार आहे? हे त्याच दिवशी स्पष्ट होणार आहे.

बुधवारी भाजपचे अशोक चराटी आणि जयवंतराव शिंपी यांच्यात बैठक झाली. या बैठकीनंतर दोघांनीही वारणानगर गाठले. या ठिकाणी कोरे यांच्यासोबत

चर्चा करण्यात आली. तोपर्यंत कारखान्याचे अध्यक्ष सुनील शिंत्रे, गोकुळच्या संचालिका अंजना रेडेकर यांनी ठाकरे गटाचे संभाजी पाटील, युवराज पोवार यांच्यासह आमदार सतेज पाटील यांची भेट घेतली. आमदार कोरे व आमदार पाटील यांनी एकत्रित आघाडी करण्याचा निर्णय घेतला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ajara Sugar Factory News
Nagar News : तक्रारी करूनही सरकारचे दुर्लक्ष; शेतकरी संघटना रस्त्यावर, गाळप बंद पाडणार...

चराठी, शिंत्रे करणार घोषणा

आमदार विनय कोरे आणि आमदार सतेज पाटील यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर कोणत्या उमेदवाराला कोणत्या गटातून संधी दिली जाणार, याबाबत चर्चा झालेली आहे. मात्र, त्याची घोषणा अशोक चराठी आणि सुनील शिंत्रे लवकरच करतील असे सांगण्यात आले.

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नाराज आणि माघार

पहिल्या बैठकीत राष्ट्रवादीला सात जागा देण्यात आल्या होत्या, परंतु चराटी यांना आठ आणि सतेज पाटील यांच्या गटाला स्वतंत्र दिलेल्या जागा आणि त्यातही शिंपी गटाचा समावेश यामुळे राष्ट्रवादीत नाराजी पसरली. त्यातून राष्ट्रवादीने माघार घेतली.

Edited by: Mangesh Mahale

Ajara Sugar Factory News
Hemant Patil : मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणाऱ्या खासदारांना राष्ट्रपतींकडून समन्स

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com