Shoumika Mahadik On GOKUL .jpg
Shoumika Mahadik On GOKUL .jpgsarkarnama

Shoumika Mahadik News: मुद्द्याचं बोला! शौमिका महाडिकांसह संस्थाचालकांनी खडसावताच अजित नरके गप्प बसले

Gokul News: काही संस्थाचालकांची लाखापेक्षा अधिक रक्कम कपात झाल्याने गोकुळच्या (Gokul) सत्ताधाऱ्यांविरोधात गुरुवारी(ता. 16) हजारोंच्या संख्येने संस्थाचालक गोकुळच्या कार्यालयावर मोर्चा घेऊन गेले. त्यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये मोठी झटापट झाली.
Published on

Gokul News : डिबेंचरची रक्कम कपात केल्यानंतर संस्थाचालक आणि दूध उत्पादकांमध्ये गोकुळ प्रशासना विरोधात संतापाची लाट आहे. दरवर्षी पंधरा टक्के रक्कम कपात होत असताना यंदा 40% रक्कम कपात केली आहे. त्याचा थेट परिणाम संस्था चालकांच्या तिजोरीवर पडणार आहे.

काही संस्थाचालकांची लाखापेक्षा अधिक रक्कम कपात झाल्याने गोकुळच्या (Gokul) सत्ताधाऱ्यांविरोधात गुरुवारी(ता. 16) हजारोंच्या संख्येने संस्थाचालक गोकुळच्या कार्यालयावर मोर्चा घेऊन गेले. त्यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये मोठी झटापट झाली. आंदोलकांनी गेट तोडून कार्यालयात प्रवेश केला.

दरम्यान, आंदोलकांचा संताप पाहता गोकुळ संघामधील काही सत्ताधारी संचालक आणि आंदोलकांचे नेतृत्व करणाऱ्या गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक (Shoumika Mahadik) यांच्यासह शिष्टमंडळ या सत्ताधाऱ्यांसोबत चर्चेसाठी गेले. उर्वरित आंदोलकांनी गोकुळ कार्यालयाच्या आवारातच ठिय्या मांडला. यावेळी माजी अध्यक्ष अरुण डोंगळे, गोकुळचे संचालक अरुण नरके, बाबासाहेब खाडे यांच्यासह सत्ताधारी अनेक संचालक उपस्थित होते.

या बैठकीत शौमिका महाडिक यांनी वर्गातील रक्कम कमी कोणाच्या सांगण्यावरून केली? त्याला संस्थाचालकांची परवानगी होती का? इतकी रक्कम कपात करण्याचे कारण काय? सत्ताधारी संचालकांच्या समोरच या मुद्द्यांना थेट हात घातला.

Shoumika Mahadik On GOKUL .jpg
Dharamrao Baba Atram: भाजपशी पंगा घेतल्याचं बक्षीस की मंत्रिपदाचा पत्ता कट? अजितदादांकडून धर्मराव बाबांना मोठी संधी

त्याला सत्ताधारी संचालकांमधून अजित नरके यांनी स्पष्टीकरण देत असताना, मुंबईतील वाशी येथील गोकुळच्या केंद्राबद्दल माहिती दिली. त्यामुळे संस्था चालकांना विषयाला बगल मिळत असल्याचे लक्षात येतात काही संचालकांनी याला आक्षेप घेतला. मात्र, विषय तसाच सुरू ठेवल्याने शौमिका महाडिक नरके यांना थेट मुद्द्याचं बोला! येथे विषय कपात केलेल्या रक्कमेचा आहे. कपात का केली याचं उत्तर संस्थाचालकांना हवे आहे.

सकाळपासून काही आंदोलक कोणाची परवा न करता न्याय मागत आहेत, त्याचे उत्तर द्या! अशा शब्दात खडेबोल सुनावले. शिवाय संस्थाचालकांनी देखील नरके यांना मुद्द्याची माहिती द्या. असे खडसावले.

Shoumika Mahadik On GOKUL .jpg
NCP Politics : अजितदादा देतात तर 'छप्पर फाड़ के'; आमदार जोडीवरचं प्रेम संपता संपेना... खोडकेंवरील मेहेबानीमुळे राष्ट्रवादीत अस्वस्थता

या प्रकरणावर वाद वाढण्याची चिन्हे दिसताच माझे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी त्यात सक्षम करत तुमच्या भावना समजल्या, कपात केलेल्या रकमे संदर्भात निर्णय घ्यायला संचालक मंडळाचा पूर्ण बोर्ड उपस्थित नाही. उद्या बैठक होणार यामध्ये पैसे कसे देता येईल, यावर मार्ग काढू, दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळी सुरू होण्यापूर्वी गोड बातमी देण्याचा प्रयत्न आम्ही करू अशी आश्वासन दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com