NCP Politics : अमरावतीच्या आमदार नागपूरच्या विश्वस्त, अजितदादांच्या राष्ट्रवादीत असंतोष : भाजपचा दबाव असल्याचा पदाधिकाऱ्यांचा आरोप

Sulbha Khodke Appointment : अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांची नागपूर सुधार प्रन्यासच्या विश्वस्तपदी नियुक्ती करण्याची शिफारस राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने करण्यात आली आहे. त्यामुळे नागपूरच्या पदाधिकाऱ्यांमध्ये चांगलाच असंतोष निर्माण झाला आहे. नागपूर जिल्ह्यात एकही सक्षम पदाधिकारी उपलब्ध नाही का? अशी विचारणा आता केली जात आहे.
Sulbha Khodke, Ajit Pawar
NCP MLA Sulbha Khodke’s appointment as Nagpur Improvement Trust trustee has stirred opposition within the party, highlighting growing dissatisfaction among local leaders.Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News, 16 Oct : अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांची नागपूर सुधार प्रन्यासच्या विश्वस्तपदी नियुक्ती करण्याची शिफारस राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने करण्यात आली आहे. त्यामुळे नागपूरच्या पदाधिकाऱ्यांमध्ये चांगलाच असंतोष निर्माण झाला आहे. नागपूर जिल्ह्यात एकही सक्षम पदाधिकारी उपलब्ध नाही का? अशी विचारणा आता केली जात आहे.

नागपूर शहराच्या सुनियोजित विकासासाठी ब्रिटिशांनी नागपूर सुधार प्रन्यासची स्थापना केली होती. आजही ती कार्यरत आहेत. नागपूर सुधार प्रन्यासच्या विश्वस्त मंडळावर अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींची नियुक्ती केली जाते. राज्यात महायुतीची सत्ता असल्याने विश्वस्ताचे एक पद राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आले आहे.

सध्या विश्वस्त मंडळात भाजपच्यावतीने पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे तर शिवसेनेच्या कोट्यातून जिल्हा प्रमुख सतीश इटकेलवार यांचा समावेश आहे. महायुतीच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात राष्ट्रवादी काँग्रेसने हे पद रिक्तच ठेवले होते. या दरम्यान अनेकांची नावे चर्चेत होती. काहींना तुमचे पत्र तयार आहे असेही गाजर दाखवले होते.

Sulbha Khodke, Ajit Pawar
Raj Thackeray News : 'मविआ' नेत्यांसोबत दिसले अन् आता राज ठाकरेंचा ऐन दिवाळीत ‘तातडीचा’ मेळावा; मोठा राजकीय ‘धमाका’ होणार?

मात्र शेवटपर्यंत हे पद भरलेच नाही. त्यानंतर पुन्हा महायुतीची सत्ता आली आहे. एक वर्षांचा कार्यकाळ उलटून गेला. तरीही राष्ट्रवादी काँग्रेसला आपल्या कार्यकर्त्यांची नियुक्ती करता आली नाही. आता मात्र अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांच्या नावाचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसने विधिमंडळ सचिवाकडे पाठवले आहे. त्यामुळे नागपूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे.

सर्व पदे खोडके यांनाच देणार का?

नागपूर सुधार प्रन्यास नागपूरच्या जिल्ह्याच्या विकासासाठी स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे विश्वस्त म्हणून नागपूरच्या प्रतिनिधिला नियुक्त करणे अपेक्षित आहे. सुलभा खोडके या अमरावतीच्या आहेत. त्यांचा नागपूरशी काही संबंध नाही. त्या नागपूरला किती वेळ देणार हा प्रश्न आहे. सुधार प्रन्यासचे विश्वस्तपद विकासासाठी अतिशय महत्त्वाचे मानले जाते.

Sulbha Khodke, Ajit Pawar
Eknath Shinde : 'स्थानिक'साठी एकनाथ शिंदेंचा वेगळाच प्लॅन, महायुती नव्हे स्वबळाचा नारा !

कदाचित भाजपच्या दबावाखाली नागपूर जिल्ह्यातील एकाही पदाधिकाऱ्यांना आमच्या पक्षाने विश्वस्तपदी घेतले नसावे. नागपूरच्या विश्वस्तपदी अमरावतीच्या आमदारांची नियुक्ती करणे हा निर्णय धक्कादायक आहे. आमच्या पक्षात कोणाची ‘दादागिरी‘ सुरू आहे हेच कळत नसल्याचे एका पदाधिकाऱ्याने सांगितले.

सुलभा खोडके आमदार असताना संजय खोडके यांना विधान परिषदेवर घेण्यात आले. दोन दिवसांपूर्वी त्यांच्याकडे पक्षाचे संघटन सचिव म्हणून महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसने सर्व महत्त्वाची पदे एकाच घरात वाटण्याचा निर्णय घेतला आहे का? असा सवालही राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते करीत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com