आता काही शो मॅन आता झालेत; Ajit Pawar यांचा निशाणा

Ajit Pawar| महाराष्ट्रातील जनतेने वर्षानुवर्ष शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे शिवतीर्थावरच दसरा मेळावा घेताना पाहिले आहे.
Ajit Pawar
Ajit Pawar
Published on: 
Updated on: 

मुंबई : गणेशोत्सव हा वर्षानुवर्ष चालत आलेला सण आहे. पण याआधी कोणताही नेता एवढ्या मोठ्या प्रमाणावर गणपतीच्या दर्शनाला जात नव्हता. आम्हीही गणपतीच्या दर्शनाला जातो, पण कधी मिडीयाचे कॅमेरे सोबत घेऊन जात नाही. काही लोकांना शो करण्याची सवय आहे. पूर्वी राजकुमार शो मॅन होते तसे आता काही शो मॅन आता झालेत, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर केली आहे. ते अहमदनगर मध्ये बोलत होते.

अजित पवार म्हणाले की, गेल्या अनेक वर्षापासून शिवतीर्थावर शिवसेनेचा दसरा मेळावा होत आहे. महाराष्ट्रातील जनतेने वर्षानुवर्ष शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे शिवतीर्थावरच दसरा मेळावा घेताना पाहिले आहे. याच शिवतीर्थावर बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं होतं की ही शिवसेना यापुढे उद्धव ठाकरे पाहतील. तेही सर्वांनी पाहिलं आहे. आज ज्यांच्या हातात सत्ता आहे ते त्यांना पाहिजे तसे निर्णय घेत आहेत. पण दसरा मेळाव्यानंतर खरी शिवसेना कोणाची हे लक्षात येईल, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

Ajit Pawar
Dasara Melava 2022 : दसरा मेळाव्याबाबत अजित पवारांचे सूचक व्यक्तव्य

याचवेळी त्यांनी काँग्रेसचे आमदार फुटण्याच्या मार्गावर असल्याच्या चर्चांवरही भाष्य केलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्याशी त्यांची भेट झाली नसल्याचे स्पष्ट केलं आहे. पण सध्या मिडीयाकडे कोणत्याही बातम्या नाहीत म्हणून अशा बातम्या देत आहेत, असंही अजित पवार यांनी सांगितलं. राज्यपाल नियुक्त 12 आमदारांबाबत सध्या जे सुरू आहे ते लोकशाहीला धरून सुरू आहे का? याचा विचार व्हायला हवा असंही अजित पवारांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Uddhav thackeray, eknath shinde, jaykumar gore
Devendra Fadnavis Hasan Mushrif .jpg
Gopichand Padalkar–Jayant Patil political rivalry
Ranjitsinh Shinde vs Abhijit Patil | Solapur Milk Union Row
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com