Anil Ramod Suspended : लाचखोर अतिरिक्त आयुक्त डॉ. अनिल रामोड अखेर निलंबित !

Anil Ramod Suspended News : लाचखोर रामोडांच्या घरी धाडीत घबाड सापडले..
Anil Ramod Suspended News
Anil Ramod Suspended NewsSarkarnama

Pune News : लाचखोर अतिरिक्त विभागीय आयुक्त अनिल रामोड यांचे निलंबन (Anil Ramod Suspended) करण्यात आले आहे. राज्य सरकारच्या वतीने त्यांना निलंबित करण्यात आले आहे. मागील आठवड्यात त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. हा प्रस्ताव राज्य सरकारला सुपूर्द करण्यात आले होते. त्यानुसार राज्य सरकारने रामोडच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत. (Latest Marathi News)

Anil Ramod Suspended News
Anil Ramod News: लाचखोर अनिल रामोड यांच्यानंतर तीन डझन अधिकारीही सीबीआयच्या रडारवर....

४८ तासांपेक्षा अधिक पोलीस कोठडीत राहिल्याचा ठपका ठेवत, या कारणामुळे रामोड यांना विभागीय आयुक्त पदावरून निलंबित करण्याचे आदेश सरकारने काढले आहेत. सीबीआयच्या मागणीनुसार विभागीय आयुक्तलयाने राज्य सरकारकडे रामोड यांच्या निलंबनाचा प्रस्ताव सरकारकडे पाठविला होता. अखेर या प्रस्तावाला मान्यता देत, सरकारने रामोडच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत.

रामोड यांच्या निलंबनानंतरही त्यांनी पुणे मुख्यालय सोडून जाता कामा नये. कोणतीही खाजगी नोकरी किंवा व्यवसाय करण्यावरही करता कामा नये. तसेच, विभागीय आयुक्तांची परवानगी न घेता पुणे शहर सोडू नये, असे निलंबनाच्या आदेशात नमूद केले आहे.

Anil Ramod Suspended News
Pimpri Vidhansabha Constituency : शिवसेनेच्या पिंपरीत विधानसभेसाठी भाजपची जोरदार तयारी ! काय म्हणतात पदाधिकारी ?

नेमकं काय आहे प्रकरण?

पुण्यातील महसूल विभागतील अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल गणपतराव रामोड यांना ९ जून रोजी लाच घेतल्याप्रकरणी रंगेहात पकडण्यात आले होते. ही कारवाई 'सीबीआय'ने केली होती. (CBI Action) त्यांना आठ लाख रुपायांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली होती.

अनिल रामोड यांच्या कार्यालयासह बाणेर (पुणे) आणि नांदेड येथील घरांवर 'सीबीआय'ने छापे टाकले होते. या कारवाईत 'सीबीआय'च्या हाती मोठे घबाड लागल्यामुळे रामोडची राज्यभर खूप चर्चा झाली. छापा टाकल्यानंतर रामोड यांच्याकडे तब्बल सहा कोटी रुपयांची रोकड आणि बेहिशेबी मालमत्तेची कागदपत्रे जप्त करण्यात आली होती. या कारवाईमुळे महसूल विभागासह राज्यात खळबळ उडाली आहे.

Anil Ramod Suspended News
ED Action On Anil Ramod: सीबीआयनंतर आता अनिल रामोडावर 'ईडी'ची वक्रदृष्टी?

अनिल रामोड यांना पालखी महामार्गासाठी भूसंपादनच्या मोबदल्यातील लाच प्रकरणी अटक करण्यात आली आहे. मोबदला देण्यासाठी त्यांनी दरपत्रक काढल्याचा तक्रारदार अॅड. याकूब साहेबू तडवी यांनी केला होता. यावेळी त्यांनी रामोडांच्या एक कोटी रुपये मोदबदल्याच्या बदल्यात १० लाख रुपये लाच घेत असल्याचे सांगितले. दरम्यान, रामोड यांच्या पुणे आणि नांदेड येथील घरातून मोठ्या प्रमाणत बेहिशेबी रोकडसह संपत्ती हाती लागली आहे. (Bribery Additional Commissioner Dr. Anil Ramod finally suspended)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com