Mumbai News : महाराष्ट्राच्या मंत्रालयातून एक महत्त्वाची फाईल गायब झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मंत्रालयातील माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयातल्या कार्यालयातून स्टुडीओ अद्यायावत करणाची महत्त्वाची फाईल गायब झाली आहे. ही फाईल कुणीतरी नष्ट केली आहे, असा संशय अधिकाऱ्यांना आहे. या बाबतीत आता मरिन ड्राईव्ह पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे. (Latest Marathi News)
याबाबत अधिक माहिती अशी की, २०१५ साली मंत्रालयात एक छोटेखानी स्टुडीओ उभारण्यात आला. या स्टुडीओची शासनाकडून मान्यता घेण्यापासून ते स्टुडीओची उभारणी करण्यापर्यंतची या संबंधित सगळी कागदपत्रे ज्या फाईलमध्ये होती, ती फाईलच सद्या गायब करण्यात आली आहे.
यामुळे आता ही फाईल गहाळ झाली का ती गहाळ करण्यात आली. या स्टुडीओ उभारणीच्या कामात काही भ्रष्टाचार झाला का? या संबंधित काही माहिती समोर आली असती का? इत्यादी प्रश्न आता उपस्थित होत आहेत. या फाईल गहाळ प्रकरणी आता मरिन ड्राईव्ह पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस करणार आहेत. (File Missing From Maharashtra Ministry)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.