Ajit Pawar : अजितदादांना नेमका कशाचा तिटकारा? सोलापूर जिल्हा बँकेत आले, पण गेटवरूनच निघून गेले...

Solapur District Bank : अजितदादांसाठी कोण आग्रही आणि ते जिल्हा बँकेत येऊ नयेत, यासाठी कोण प्रयत्न करत होते?
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Solapur Political News : महायुतीत सहभागी झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत यावे, अशी मागणी बँकेच्या माजी पदाधिकाऱ्यांनी केली होती. मात्र या निमंत्रणावरून जुन्या राष्ट्रवादीत असलेले गटबाजी अजितदादांच्या नव्या राष्ट्रवादीतही ठासून भरल्याचे आज प्रकर्षाने जाणवले. यातूनच की काय अजित पवार येऊनही बँकेच्या गेटवरूनच निघून गेल्याचे शनिवारी रात्री पाहायला मिळाले.

सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसने ज्या लोकांना ताकद दिली. ज्या लोकांना जिल्हा बँकेत संचालक केले. त्याच नेत्यांनी जिल्हा बँकेची अक्षरश: वाट लावली. आता दौऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री पवार (Ajit Pawar) जिल्हा बँकेत यावेत, अशी विनंती काहींनी केली. मात्र त्यास काहींनी विरोधही केला. अजितदादांसाठी कोण आग्रही आणि ते जिल्हा बँकेत येऊ नयेत, यासाठी कोण प्रयत्न करत होते, याची बेरीज केल्यास उपमुख्यमंत्री पवारांना त्यांच्या राष्ट्रवादीतील जिल्ह्यातील गटबाजी सहजपणे लक्षात येईल.

Ajit Pawar
Chhagan Bhujbal : छगन भुजबळांनी मनोज जरागेंची उडवली खिल्ली; म्हणाले, 'बजेटमध्ये आरक्षण...'

गेल्या पाच वर्षांपासून प्रशासकाच्या हातात असलेली सोलापूर (Solapur) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आता कुठे तळ्यावर येऊ लागली आहे. या बँकेची कैफियत राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी ऐकावी, बँकेच्या भल्यासाठी नक्की काय योग्य, प्रशासक की निवडणूक? याबाबत चर्चा करावी, अशी इच्छा काही मंडळीची होती. मात्र त्यास काहींचा विरोधही होता. यावरूनच अजितदादांच्या राष्ट्रवादीत व सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात सध्या दोन गट खदखदत असल्याचे समोर आले आहे.

Ajit Pawar
Bazar Samiti : 'निवडणूक खर्च काढण्यासाठी बाजार समितीची जमीन बिल्डरच्या घशात...'

दरम्यान, निरोपानंतर जिल्हा बँकेमध्ये अजित पवार यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे व सोलापूर शहरातील सर्व कार्यक्रम संपल्यानंतर मी तुमच्याकडे येईल, असा सांगावा कर्मचाऱ्यांना अजितदादांच्या समन्वय गटामधून धाडण्यात आला होता. त्यानुसार तब्बल तीन तास या मंडळींनी अजितदादांची वाट पाहिली.

अजितदादा येणार म्हटल्यावर कर्मचारी रात्री उशिरापर्यंत जिल्हा बँकेत वाट पाहत थांबले. उपमुख्यमंत्री पवारांनी माजी संचालकांचा मान राखत जिल्हा बँकेच्या प्रवेशद्वारापर्यंत येण्याचे मान्य केले. दुपारपासून ताटकळत बसलेल्या कर्मचाऱ्यांच्या जीवात जीव आला. अजितदादांचे स्वागत फटाक्यांची आतिषबाजी करत हलग्यांचा कडकडाट करत केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अजितदादा व्यवहाराच्या बाबतीत एकदम चोख आहेत. खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटंं म्हणणारे आहेत. सोलापूर जिल्हा बँकेच्या व्यवहारात आणि राजकारणात सध्या याच तत्वाची आवश्यकता आहे. अजितदादांचे विचार ऐकण्यासाठी आसुसलेल्या जिल्हा बँकेच्या माजी पदाधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना मात्र गेटवरच्या स्वागतावरच समाधान मानावेे लागले. त्यामुळे अजित पवारांना आपल्या पक्षातील दोन गटांचा तिटकारा तर आला नसेल ना, अशी चर्चा सुरू झाली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Ajit Pawar
Pune Congress : हमरीतुमरी, शिवीगाळ अन्...; पुणे काँग्रेसमध्ये तुफान राडा, नेमकं काय झालं?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com