अहमदनगर : शिर्डी येथे कोरोना संकट काळात भाविकांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले होते. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी राष्ट्रवादी युवकचे माजी प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांच्या प्रयत्नाने उपमुख्यमंत्री अजित पवारांसह महाविकास आघाडीतील नेत्यांनी शिर्डीतील भाविकांसाठी महत्वपूर्ण निर्णय घेतले. Ajit Pawar's attention on Shirdi Sansthan: These facilities provided to devotees
शिर्डी संस्थान ऑफलाईन दर्शन पास संदर्भात पालकमंत्री हसन मुश्रीफ, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व शिर्डी संस्थान प्रसादालय भोजनालय सुरू करण्यासंदर्भात अजित पवारांनी घातले लक्ष आहे. कोरोना नियमांचे पालन करून ऑफलाइन पासेस सुरू करण्यासंदर्भात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले होते. कोरोनाचा प्रादुर्भावानंतर व लाट सरल्यानंतर 15 हजार भाविकांची दर्शनाची सोय संस्थांनी केलेली होती पण त्याच्यासाठी ऑनलाईन बुकींग करून दर्शनासाठी येणे बंधनकारक होते.
ऑनलाईन दर्शनाची बुकींग करण्याची प्रक्रिया अतिशय किचकट होती. राष्ट्रवादी युवकचे माजी प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी हसन मुश्रीफ व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे पाठपुरावा करून ऑफलाइन पासेस म्हणजेच शिर्डीत येऊन पासेस घेऊन दर्शन करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती ती मागणी मान्य करत दहा हजार जणांना ऑफलाइन पासेस म्हणजे शिर्डीत पासेस घेऊन दर्शनाला जाण्याची मुभा देण्यात आली होती.
15 हजार ऑनलाईन पास बुकींग व 10 हजार ऑफलाईन असे एकूण 25 हजार भाविक दर्शन घेत आहेत. ऑफलाइन सुविधा चालू केल्याने साई भक्तांची मोठी सुरू झाली आहे.
त्यावेळी श्री साई प्रसादालय देखील बंद होते. कोविड नियमांचे पालन करुन प्रसादालय सुरू व्हावे व भाविकांना कमी दरात प्रसाद मिळावा ही अनेक भाविकांची इच्छा होती. त्या संदर्भातील उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर अजित पवारांनी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांना या संदर्भात आदेश दिले होते. या संदर्भात दिगंबर कोते यांनी देखील उपोषण केले होते. या सर्व सामूहिक प्रयत्नांना यश मिळून श्री साईबाबा संस्थान चे प्रसादालय सुरू झाल्याने शिर्डीत येणाऱ्या भाविकांची जेवणाची सोय सुखकर झालेली आहे.
यासंदर्भात संग्राम कोते यांनी सातत्याने उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री हसन मुश्रीफ व त्या खात्याच्या विधी व न्याय मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. यातच शिर्डी संस्थानच्या अध्यक्षपदावर आमदार आशुतोष काळे यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. एक काळ विखे कुटूंबीयांच्या जवळ असलेले हे देवस्थान आता राष्ट्रवादीजवळ आले आहे. त्यामुळे अजित पवार या देवस्थानवर अधिक लक्ष देऊन आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.