Solapur NCP : वडील पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष; तर मुलगा अजितदादांच्या पक्षाचा तालुकाध्यक्ष!

Father & Son News : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उत्तर सोलापूर तालुकाध्यक्षपदी जितेंद्र साठे यांची निवड
 Jitendra Sathe-Baliram Sathe
Jitendra Sathe-Baliram SatheSarkarnama
Published on
Updated on

Solapur News : उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उत्तर सोलापूर तालुकाध्यक्षपदी जितेंद्र बळिराम साठे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जितेंद्र साठे यांचे पिताश्री बळिराम साठे हे शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष आहेत. त्यामुळे मुलाकडे अजितदादांच्या राष्ट्रवादीची तालुक्याची सूत्रे, तर वडिलांकडे शरद पवार गटाची जिल्ह्याची कमान असणार आहे, याची चर्चा मात्र राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे. (Ajit Pawar's NCP elected Jitendra Sathe as North Solapur Taluka President)

राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) सोलापूर जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार दीपक साळुंखे यांनी पक्षाची जंबो जिल्हा कार्यकारिणी नुकतीच जाहीर केली. त्यात ११ उपाध्यक्ष, सहा सरचिटणीस, कार्यकारिणीचे २२ सदस्य, १२ प्रांतिक सदस्य, अकरा तालुकाध्यक्ष आणि कार्याध्यक्ष नेमण्यात आले आहेत. या पदाधिकाऱ्यांना जिल्हाध्यक्ष साळुंखे यांनी कामाला लागून पक्षाला जिल्ह्यात एक नंबरचे बनविण्याचे आवाहन केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

 Jitendra Sathe-Baliram Sathe
OBC Melava : सग्यासोयऱ्यांच्या अधिसूचनेनंतर आक्रमक भुजबळ नगरमधून फुंकणार संघर्षाचे रणशिंग!

बळिराम साठे हे शरद पवार यांचे अत्यंत विश्वसनीय सहकारी आहेत. दीपक साळुंखे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद सोडल्यानंतर ते साठे यांच्याकडे आले. तेव्हापासून साठे यांच्याकडे सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आहे. अनेक मातब्बर नेते असूनही पवारांनी आपल्या विश्वासू सहकाऱ्याकडे पक्षाचे जिल्हाध्यक्ष कायम ठेवले आहे. साठे यांनी पद सोडण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतरही केवळ पवारांच्या शब्दाखातर साठे हे जिल्हाध्यक्षपदी काम करत आहेत.

दरम्यान, अजित पवार हे शिवसेना-भाजप युतीसोबत जात उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर राज्यभरातील राष्ट्रवादीत फूट पडली. तशी ती सोलापूर जिल्ह्यातील पडली. अनेक ठिकाणी घरातही विभागणी झाली. जितेंद्र साठे आणि त्यांचे सुपुत्र जयदीप साठे यांनीही अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यावेळीही जिल्ह्यात या प्रवेशाची चर्चा झाली होती. विकासाच्या नावाखाली मुलगा आणि नातवाने अजितदादांसोबत जाण्याचा निर्णय घेतला असला तरी बळिराम साठे मात्र पवारांवर निष्ठा ठेवून आहेत. ते आजही पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आहेत.

 Jitendra Sathe-Baliram Sathe
Maratha Reservation Decision : मराठा आरक्षणाच्या निर्णयावरील टीकेला फडणवीसांचे उत्तर... अर्धे लोक टीका करीतच असतात

अजित पवार गटाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांनी नुकतीच सोलापूर जिल्ह्याची जंबो कार्यकारिणी जाहीर केली. त्यात उत्तर सोलापूर तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी जितेंद्र साठे यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. त्यांच्या सोबतीला नान्नज येथील प्रकाश चोरेकर यांना कार्याध्यक्ष नेमण्यात आले आहे. आता हे पिता-पुत्र आपापल्या पक्षाचा विस्तार कशा पद्धतीने करणार, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

 Jitendra Sathe-Baliram Sathe
Maratha Reservation Benefit : 'मराठा आरक्षणाच्या निर्णयाचा शिंदेंच्या शिवसेनेला फायदा; तर भाजपचा दुहेरी तोटा’

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com