Nagar News : मराठा कुणबी नोंदी असलेल्यांच्या सग्यासोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याबाबत अधिसूचनेचा मुसदा प्रसिद्ध झाल्यानंतर ओबीसी नेते आरक्षण बचावासाठी सक्रिय झाले आहेत. सग्यासोयऱ्यांच्या अधिसूचनेनंतर मंत्री छगन भुजबळ यांचा नगरमध्ये तीन फेब्रुवारीला पहिला एल्गार मेळावा होत आहे.
हा एल्गार मेळावा यशस्वी होण्यासाठी नगरमधील ओबीसी समाजातील पदाधिकाऱ्यांनी तालुकानिहाय बैठकांवर लक्ष केंद्रीत केले आहे. ओबीसी समाजाचे आरक्षण वाचवण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांच्यामागे ठामपणे उभे राहण्याचे आवाहन या बैठकांतून केले जात आहे. (OBC Melava will be held in Nagar on February 3)
नेवासे तालुक्यातील कुकाण येथे समता परिषदेचे बैठक झाली. या बैठकीत समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी आमदार पांडुरंग अभंग, प्रवक्ते नागेश गवळी, जिल्हाध्यक्ष प्रशांत शिंदे, भिवाजी आघाव, सुधाकर आव्हाड, शशिकांत मतकर, कुंभार समाजाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र बोरुडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दत्तात्रय काळे, सावता परिषदेचे उपाध्यक्ष राहुल जावळे, अल्पसंख्याक सेलचे अब्दुल शेख आदी उपस्थित होते. (OBC Melava)
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
माजी आमदार पांडुरंग अभंग म्हणाले,"ओबीसी आरक्षण मिळवताना अगोदर खूप त्रास सहन करावा लगाला आहे. मंत्री छगन भुजबळ यांना अनेक संकटांना समोरे जावे लागत आहे. आता ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी ते लढत आहेत. ओबीसींच्या हक्कांच्या रक्षणासाठी सर्व घटक जातींनी एकत्र येऊन भुजबळ यांच्या मागे ठामपणे उभे राहण्याची ही वेळ आहे".
नगरमध्ये तीन फेब्रुवारीला ओबीसींचा होत असलेला एल्गार मेळावा यशस्वी होणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्र या. या मेळाव्यासाठी ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यासह महादेव जानकर, प्रकाश शेंडगे, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार राम शिंदे हे देखील असणार आहे. ओबीसींच्या आरक्षणाला हे नेते आपल्या एकजुटीच्या मागणीतून धक्का लावून देणार नाहीत, असेही माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी म्हटले आहे.
प्रवक्ते नागेश गवळी यांनी आपण आपल्या ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी एकत्र येत आहोत. हे करताना कोणावरही अन्याय होणार नाही, याची काळजी घेत आहे. त्यांना आरक्षण हवे, असल्यास ते स्वतंत्र त्यांना मिळू देत. पण, ओबीसींच्या हक्काच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये, यासाठी हा एल्गार मेळावा यशस्वी करायचा आहे, असे म्हणाले.
एल्गार मेळाव्यासाठी तालुकानिहाय बैठका
ओबीसी समाजाचे नेते मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थित काल मुंबईत बैठक झाली. यात नगरमध्ये तीन फेब्रुवारीला होत असलेल्या एल्गार मेळाव्याच्या नियोजनाचा आढावा घेण्यात आला.
हा मेळावा यशस्वी करण्याबरोबरच सरकारला इशारा देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानुसार मेळाव्यातून शक्तिप्रदर्शन करण्यावर भर देण्याचे ठरले आहे. नगर जिल्ह्यासह महाराष्ट्रातून ओबीसी समाज येथे एकटवणार आहे. तसे महाराष्ट्रातील ओबीसी नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तालुकानिहाय नियोजन करावे, असे सूचविण्यात आले.
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.