Ajit Pawar on Rajesh Patil's Oath : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार जोपर्यंत मुख्यमंत्री होत नाहीत, तोपर्यंत मी वाढदिवस साजरा करणार नाही, अशी प्रतिज्ञा राष्ट्रवादी काँग्रेसचे चंदगडचे आमदार राजेश पाटील यांनी केली आहे. त्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांची प्रतिक्रिया आली आहे. प्रेमापोटी लोकं बोलत असतात, पण त्या गोष्टीला काही अर्थ नसतो. कारण पाठीशी १४५ आमदारांचा आकडा लागतो, असे पवार यांनी नमूद केले. (Ajit Pawar's reaction to MLA Rajesh Patil's oath)
जळगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) अधिवेशनासाठी आलेल्या पवार (Ajit Pawar) यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना राजेश पाटील (Rajesh Patil) यांच्या प्रतिज्ञेबाबत विचारले असता त्यांनी मुख्यमंत्रिपद आणि आमदारांच्या संख्याबळाबाबत भाष्य केले.
विरोधी पक्षनेते पवार म्हणाले की, प्रेमापोटी काही लोक असं बोलत असतात. त्यातून पुन्हा वेगवेगळ्या प्रकारची चर्चा होते, गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत, असं म्हटलं जातं. प्रत्येकजण आपापल्या परीनं प्रचार करत असतो. राजेश पाटील यांनी केलेल्या घोषणेला काही एक अर्थ नाही.
कोणालाही या राज्याचा प्रमुख व्हायचं असेल तर त्यांनं १४५ आमदार स्वतःच्या पाठीशी उभे करावेत. जी व्यक्ती १४५ आमदार स्वतःच्या पाठीशी उभी करेल, ती व्यक्ती या राज्याचा मुख्यमंत्री होईल, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.
काय म्हणाले राजेश पाटील?
जोपर्यंत अजित दादांना मुख्यमंत्री होत नाहीत, तोपर्यंत वाढदिवस साजरा करणार नाही, अशी शपथ कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश पाटील यांनी घेतली आहे. राजेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात बोलताना त्यांनी हा निर्णय घेतला. इतकेच नव्हे तर, काँग्रेस राष्ट्रवादीसह त्यांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना एकसंघ राहण्याचं आवाहनही केलं आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकविण्याचे स्वप्न पाहिले आहे. त्यासाठीच त्यांनी ही भाकरी फिरवली आहे, त्यामुळे आता अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत आणि चंदगडमध्ये लालदिव्याची गाडी यावी, यासाठी मतभेद बाजूला ठेवून कामाला लागा, असं आवाहन करत वाढदिवस साजरा न करण्याचा निर्धार राजेश पाटील यांनी केलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.