अजित पवारांचे उत्तर नगर जिल्ह्यावर लक्ष्य : पक्ष पदाधिकाऱ्यांना दिले आदेश

कोपरगावमध्ये दोन दिवसांपूर्वी विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) आले होते.
Hasan Mushrif, Dilip Walse Patil, Sangram Kote Patil, Ajit Pawar
Hasan Mushrif, Dilip Walse Patil, Sangram Kote Patil, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

अहमदनगर - कोपरगावमध्ये दोन दिवसांपूर्वी विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) आले होते. या वेळी त्यांनी शिर्डीमध्ये राष्ट्रवादी युवकचे माजी प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. तसेच संग्राम कोते यांना पक्ष संघटन मजबुतीचे आदेश दिले. कोपरगाव येथे गेल्यावर अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे यांची भेट घेऊन त्यांनाही पक्षसंघटना मजबूत करण्याचे आदेश दिले. त्यामुळे आगामी निवडणुकांत राष्ट्रवादी काँग्रेस उत्तर नगर जिल्ह्यात मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. ( Ajit Pawar's target in the northern part of Ahmednagar district: orders given to party office bearers )

अजित पवार हे शिर्डीत कोते यांच्या घरी गेले. त्यांच्या बरोबर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार सदाशिव लोखंडे आदी उपस्थित होते. यावेळी चहा-नाष्ट्याबरोबरच अहमदनगर जिल्ह्यातील उत्तर भागातील राजकीय चर्चाही झाला.

Hasan Mushrif, Dilip Walse Patil, Sangram Kote Patil, Ajit Pawar
पोलिसांच्या सोयी-सुविधा व घरांसाठी अधिकचा निधी देणार – अजित पवार

अजित पवार म्हणाले, संग्राम पक्षाच्या आव्हानात्मक काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विरोधी पक्षात असताना ज्या सक्षम पद्धतीने विद्यार्थी व युवक काँग्रेसची जबाबदारी तुम्ही सांभाळली तुमचं काम पक्षाच्या स्मरणात आहे. आता पुन्हा एकदा त्याच जोमाने कामाला लागा. पक्ष तुमच्या पाठीशी पूर्ण पाठबळ उभा करेल असा आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्याची माहिती संग्राम कोते पाटील यांनी दिली.

सुमारे एक तास या राजकीय गप्पा चालल्या. यावेळी अजित पवारांनी शिर्डी संस्थान, श्री गणेश सहकारी साखर कारखाना तसेच परिसरातील संस्थानची असलेली परिस्थितीची माहिती घेतली.

Hasan Mushrif, Dilip Walse Patil, Sangram Kote Patil, Ajit Pawar
संग्राम कामाला लाग ! अजितदादांचा कोते पाटील यांना आदेश

अनौपचारिक गप्पांमध्ये अजित पवार यांनी संग्राम कोते यांनी राष्ट्रवादी विद्यार्थी व युवक प्रदेशाध्यक्ष म्हणून केलेल्या कामाचा आवर्जून उल्लेख केला. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे तुमच्या तालुक्यातील शिर्डी शहरातील कुठले प्रश्न असल्यास ते आवर्जून घेऊन या ते सोडवण्याची जबाबदारी आमची असा शब्दही अजित पवार यांनी दिल्याचे संग्राम कोते यांनी सांगितले.

अजित पवार यांनी कोपरगावमध्ये गेल्यावर संदीप वर्पे यांची निवासस्थानी सदिच्छा भेट देत अनेक राजकीय विषयांवर चर्चा केली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याचे आदेश दिले. कोपरगावमधील सभेतही अजित पवार यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकांत ताकद दाखविण्याचे आवाहन केले. त्यामुळे आता अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तरही राष्ट्रवादी काँग्रेस अधिक सक्षम करण्याची तयारी अजित पवारांनी सुरू केल्याची चर्चा आहे.

Hasan Mushrif, Dilip Walse Patil, Sangram Kote Patil, Ajit Pawar
सुजय विखे म्हणाले, अजित पवारांच्या आदेशानेच नगर जिल्ह्यातील गावांत लॉकडाऊन

भाजपच्या पट्ट्यावर राष्ट्रवादीचे लक्ष्य

कोपरगाव, शिर्डी व राहाता या तीनही नगरपालिकांवर भाजपचे वर्चस्व आहे. शिवाय शिर्डी विधानसभा मतदार संघात राधाकृष्ण विखे पाटील तर कोपरगाव विधानसभा मतदार संघात बिपीन कोल्हे व राजेश परजणे यांचे वर्चस्व आहे. ही नेते मंडळी सध्या भाजपमध्ये आहेत. कोपरगावमध्ये विजय वहाडणे यांची ताकद आहे. भाजपच्या या बालेकिल्ल्याला शह देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तयारी सुरू केली आहे.

Hasan Mushrif, Dilip Walse Patil, Sangram Kote Patil, Ajit Pawar
देवेंद्र फडणवीसांवर आणखी एक महत्त्वाची जबाबदारी

देवेंद्र फडणवीस काय करणार?

भाजपने अहमदनगर जिल्ह्याची जबाबदारी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोपविली आहे. देवेंद्र फडणवीस जिल्ह्यात येण्यापूर्वीच भाजपच्या संपर्कात राष्ट्रवादी काँग्रेसमधीलच एक नेता असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली आहे. त्यामुळे आता अहमदनगर जिल्ह्यातील आगामी निवडणुकांत भाजप विरूद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढत पहायला मिळणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com