Dattatray Bharane Solapur Tour : राष्ट्रवादीच्या ‘डॅमेज कंट्रोल’साठी अजितदादांचे विश्वासू दत्तामामा सोलापूर दौऱ्यावर; नाराजांची समजूत काढणार?

Solapur NCP News : सोलापूर राष्ट्रवादीतील चार माजी आमदार भाजपच्या वाटेवर गेल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॅमेज कंट्रोलसाठी कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांना सोलापूर दौऱ्यावर पाठवले आहे.
Dattatray Bharane
Dattatray BharaneSarkarnama
Published on
Updated on
  1. संपर्कमंत्री भरणे सोलापूर दौऱ्यावर: राष्ट्रवादीचे कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांना सोलापूर संपर्कमंत्रिपद देऊन अजित पवार यांनी नाराज नेत्यांची समजूत काढण्याची जबाबदारी सोपवली आहे.

  2. चार माजी आमदार भाजपकडे झुकले: राजन पाटील, यशवंत माने, बबनराव शिंदे आदींच्या भाजप प्रवेशामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादीत मोठी घसरण दिसून येत आहे.

  3. महायुतीत जागा वाटपावर संकट: भाजप, शिवसेनामधील इनकमिंग आणि राष्ट्रवादीच्या ताकदीच्या राजकारणामुळे आगामी निवडणुकांसाठी जागावाटप तणावपूर्ण होणार आहे.

Solapur, 20 October : सोलापूर जिल्ह्याचे संपर्कमंत्री म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्यावर जबाबदारी सोपविली. मात्र, सोलापूर राष्ट्रवादीत दोन दिवसांपूर्वीच राजकीय भूकंप झाला, पक्षाचे तब्बल चार माजी आमदार भाजपच्या वाटेवर आहेत, त्यामुळे ‘डॅमेज कंट्रोल’साठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपले विश्वासू सहकारी कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांना सोलापूरच्या दौऱ्यावर पाठवले आहे. कृषिमंत्री भरणे आता नेमके कशा पद्धतीने नाराजांची समजूत घालतात आणि यातील किती जणांना राष्ट्रवादीसोबत ठेवतात, हे पाहावे लागेल.

दरम्यान, संपर्कमंत्री दत्तात्रेय भरणे (Dattatray Bharane ) हे मंगळवारी (ता. २१ ऑक्टोबर) सोलापूरच्या दौऱ्यावर येणार आहेत. इंदापूरच्या दत्तामामांसोबतची जिल्हा राष्ट्रवादीची बैठक मंगळवारी सकाळी अकरा वाजता माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या नगोर्ली (ता. माढा) फार्महाउसवर होणार आहे. सोलापूरच्या राष्ट्रवादीसाठी इंदापूर आणि करमाळ्याचे मामा सरसावले आहेत. आगामी निवडणुकीत कोण सोबत, कोण बाजूला? याचा काहीसा अंदाज या बैठकीतून येणार आहे.

राष्ट्रवादीचे नेते, मोहोळचे माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार यशवंत माने, माढ्याचे माजी आमदार बबनराव शिंदे यांचे चिरंजीव रणजितसिंह शिंदे यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली. येत्या काळात हे तीनही नेते भाजपवासी होण्याचे जवळपास निश्‍चित झाल्यानंतर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचा (NCP) अंदाज घेण्यासाठी संपर्कमंत्री भरणे यांचा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

जिल्हा राष्ट्रवादीची जबाबदारी असलेल्या उमेश पाटील यांनी या बैठकीसाठी जुळवा-जुळव केली असून आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीचे सोशल आणि पॉलिटिकल कॉम्बिनेशन कसे असेल? याचा ट्रेलरच त्यांनी दाखविला आहे.

Dattatray Bharane
APMC News : मंत्री जयकुमार गोरेंचा डाव यशस्वी, राष्ट्रवादीचा सदस्य फुटला : माण बाजार समितीवर भाजपचा झेंडा

नगोर्लीची बैठक आटोपून संपर्कमंत्री भरणे मंगळवारी (ता. २१) दुपारी दोनच्या सुमारास सोलापूर शहरात येणार आहेत. शासकीय विश्रामगृहात ते सोलापूर शहर राष्ट्रवादीचा आढावा घेणार असून या बैठकीचे नियोजन शहराध्यक्ष संतोष पवार व कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी केले आहे. शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून अनेक पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक आहेत. याबाबतीतही चाचपणी होण्याची शक्यता आहे.

कृषिमंत्री भरणे यांच्यावर सोलापूरच्या संपर्कमंत्रिपदाची जबाबदारी आल्यानंतर सोलापुरातील काही भाच्च्यांचा उत्साह जरा जास्तच वाढला आहे. या उत्साहाचा चांगलाच अनुभव संपर्कमंत्री भरणे यांनी मागील दौऱ्यात घेतला आहे. हा उत्साह आवरण्याचे मोठे आव्हान मंत्री भरणे यांच्यासमोर दिसत आहे.

जागा वाटपावर ‘महायुती’चे भवितव्य

शिवसेनेत झालेले इनकमिंग, भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात होऊ घातलेले इनकमिंग, राष्ट्रवादीने केलेली तयारी पाहता आगामी निवडणुकांसाठी महायुतीकरिता जागा वाटप महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. कोणाची ताकद किती? याचा अंदाज घेऊन जागावाटप होणार आहे? जागा वाटपात सन्मान न राखल्यास प्रत्येकाला स्वबळाचा मार्ग खुला असणार आहे.

Dattatray Bharane
Bachchu Kadu : 'कमी दरात सोयाबीन विकावं लागत असेल तर बांगड्या भरा; स्वत:ला संपवण्यापेक्षा आमदाराला कापून टाका...', बच्चू कडूंची संतप्त प्रतिक्रिया

‘तुतारी’वाले आमदार काय करणार?

नारायण पाटील, अभिजित पाटील, उत्तम जानकर आणि राजू खरे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे चार आमदार विकासकामांसाठी महायुतीशी असलेली जवळीक वारंवार सांगताना दिसतात. आगामी निवडणुकीत हे आमदार कोणत्या झेंड्याचा आधार घेणार? यावर महायुती, महाविकास आघाडी की सोयीची स्थानिक आघाडी या प्रश्‍नांची उत्तरे अवलंबून आहेत.

A1. कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांना सोलापूर संपर्कमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

Q2. सोलापूर राष्ट्रवादीत राजकीय भूकंप का झाला?
A2. पक्षातील चार माजी आमदार भाजपच्या वाटेवर गेल्याने मोठा धक्का बसला आहे.

Q3. भरणे यांचा दौरा का महत्त्वाचा आहे?
A3. नाराज नेत्यांची समजूत घालून राष्ट्रवादीत एकता राखण्यासाठी हा दौरा निर्णायक ठरणार आहे.

Q4. महायुतीसमोर कोणते प्रमुख आव्हान उभे आहे?
A4. आगामी निवडणुकीसाठी जागा वाटपाचा प्रश्न महायुतीतील तणावाचे मुख्य कारण ठरू शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com