Solapur kidnapping Case : गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्याचं अपहरण; चारही आरोपींना चार दिवसांची पोलिस कोठडी

Police Custody News : शरणू हांडे याचे सोलापूर शहरातून सायंकाळी पाचच्या सुमारास अपहरण झाले होते. पाेलिसांनी सतर्कता दाखवून कर्नाटकातील झळकीजवळ अपहरणकर्त्यांच्या ताब्यातून हांडे याची सुटका केली
Sharanu Hande kidnapping case
Sharanu Hande kidnapping caseSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 08 August : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा कार्यकर्ता शरणू हांडे याचे गुरुवारी (ता.07 ऑगस्ट) सायंकाळी सोलापूर शहरातून अपहरण झाले होते. पोलिसांनी अत्यंत नाट्यमय पद्धतीने पाठलाग करून हांडेची सुटका केली होती. त्या प्रकरणात चार जणांना अटक करण्यात आली होती. त्यांना आज (ता. 08 ऑगस्ट) सोलापूरच्या न्यायालयात हजर करण्यात आले, न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेऊन या चारही संशयित आरोपींना चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

शरणू हांडे अपहरण आणि मारहाण प्रकरणी सोलापूर पोलिसांनी (Solapur Police) संशयित आरोपी म्हणून अमित सुरवसे, सुनील पुजारी, दीपक मेश्राम, अभिषेक माने यांना ताब्यात घेऊन अटक केली होती. त्या चारही आरोपींना आज पोलिसांनी न्यायालयात हजर केलं होतं. अपहरण आणि मारहाणीच्या प्रकरणाचा अधिकचा तपास करण्यासाठी पोलिसांनी आरोपींना 7 दिवसांची पोलिस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी केली होती.

पोलिस कोठडीच्या (police custody) मागणीला आरोपीचे वकिल शरद पाटील यांनी युक्तिवादाच्या माध्यमातून विरोध केला होता. संशयित आरोपींकडून सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, त्यामुळे त्यांना पोलिस कोठडीच्या ऐवजी न्यायालयीन कोठडी देण्यात यावी, अशी विनंती युक्तीवादाच्या माध्यमातून केली.

न्यायमूर्ती वी. ए. कुलकर्णी यांनी दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकून घेतलं. पोलिस कोठडी की न्यायलयीन कोठडी या बाबतीतला निर्णय काही वेळाने देणार असे सांगण्यात आले. त्यानंतर काही वेळाने या प्रकरणात सोलापूरच्या न्यायालयाने चारही संशयित आरोपींना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. संबंधित संशयित आरोपींची पोलिस कोठडी संपल्यानंतर येत्या 12 तारखेला पुन्हा सोलापूरच्या न्यायालयात हजर केलं जाणार आहे.

Sharanu Hande kidnapping case
Rohit Pawar : ‘माझ्या फोनवर व्हिडिओ कॉलची सुविधाच नाही, मी माझ्या बायकोशीच व्हिडिओ कॉलवर बोलत नाही तर हांडे कोण लागून गेला’?

दरम्यान, शरणू हांडे याच्या अपहरणप्रकरणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांचा फोटो दाखवत शरणू हांडे अपहरण प्रकरणाचा ‘मास्टर माईंड’ असल्याचा आरोप केला. तसेच, रोहित पवार तुम्ही कार्यकर्त्यांमध्ये वाद कशाला लावता?, त्यापेक्षा मला सांगा, मी बारामतीमध्ये येतो. रोहित पवार यांनी मला वेळ आणि ठिकाण सांगावं, मी तिथे येतो, असे आव्हान दिले होते.

Sharanu Hande kidnapping case
Gopichand Padalkar : ‘शरणू हांडे प्रकरणाचे रोहित पवार मास्टरमाईंड; कार्यकर्त्यांत वाद कशाला लावता? मी बारामतीत कोठे येऊ सांगा?’

आमदार रोहित पवार यांनी शरणू हांडे अपहरण प्रकरणी होत असलेला आरोप खोडून काढताना माझ्या फोनला व्हिडिओ कॉलची सुविधा नाही, असे सांगितले होते. तसेच, मी रोज एका मंत्र्याचे प्रकरण बाहेर काढत आहे, त्यामुळे मला अडकविण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोपही केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com