Amal Mahadik : मुख्यमंत्र्यांना माजी आमदाराचे साकडे, पूरग्रस्तांना भरीव मदत देण्याची विनंती

Eknath Shinde and Amal Mahadik : दरवर्षी येणाऱ्या महापुराने शेतकरी वर्ग हैराण झाला आहे. अशातच करवीर, हातकणंगले, शिरोळ आणि पन्हाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना सर्वात जास्त फटका बसला आहे.
Eknath Shinde and amal Mahadik
Eknath Shinde and amal Mahadik Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यात महापूरामुळे हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेल्याने खरीप हंगामातील पिकांना मोठा फटका बसला आहे. दरवर्षी येणाऱ्या महापुराने शेतकरी वर्ग हैराण झाला आहे.

अशातच करवीर, हातकणंगले, शिरोळ आणि पन्हाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना सर्वात जास्त फटका बसला आहे.त्यामुळे माजी आमदार अमल महाडिक (Amal Mahadik) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी साकडे घातले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात जुलै 2024 मधील अतिवृष्टीने आलेल्या महापूरामुळे झालेल्या नुकसानीचे 2019-20 या सालाप्रमाणे पंचनामे करून नुकसानग्रस्तांना भरीव आर्थिक मदत करण्याची विनंती माजी आमदार अमल महाडिक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे केली.

Eknath Shinde and amal Mahadik
Gandhinagar Sarpanch Sandeep Patole : सतेज पाटील गटात सामील झालेल्या गांधीनगरचे सरपंच संदीप पाटोळेंवर सदस्यांचे गंभीर आरोप!

कोल्हापूर जिल्ह्यात या महापूरामुळे शेतकर्‍यांच्या ऊस व इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. तसेच व्यापार, उद्योग, व्यावसायिक व सर्वसामान्य नागरिकांच्या राहत्या घरांची पुराच्या पाण्यामुळे पडझड होवून नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्तांना देखील जास्तीत-जास्त आर्थिक मदत होणे गरजेचे आहे.

या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्तांना सन 2019-20 मध्ये आलेल्या महापूरावेळी ज्याप्रमाणे पंचनामे झाले त्याचप्रमाणे याही वेळेस पंचनामे करून शासनामार्फत त्यांना भरीव आर्थिक मदत जाहीर करणे आवश्यक असल्याचे महाडिक यांनी मुख्यंत्र्यांची भेट घेऊन सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com