Gandhinagar Sarpanch Sandeep Patole : सतेज पाटील गटात सामील झालेल्या गांधीनगरचे सरपंच संदीप पाटोळेंवर सदस्यांचे गंभीर आरोप!

Gandhinagar Gram Panchayat Members On Sandeep Patole : पाटोळेंच्या भ्रष्टाचाराची पाळेमुळे बाहेर काढल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असा इशाराही दिला गेला आहे.
Gandhinagar Sarpanch
Gandhinagar SarpanchSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur Political News : गांधीनगरचे सरपंच संदीप पाटोळे यांच्यासह काही सदस्यांनी आमदार सतेज पाटील गटात प्रवेश केला. त्यानंतर महाडिक गटाच्या सदस्यांनीे सरपंच संदीप पाटोळे यांना लक्ष करत त्यांच्यावर टीका केली आहे.

पाटोळे यांनी गांधीनगरच्या जनतेशी गद्दारी केली आहे. गांधीनगरच्या लोकांनी त्यांना सरपंच केले होते ,आता जन आंदोलन व लोकशाहीच्या माध्यमातून त्यांना सरपंचपदावरून पायउतार करू. त्यांनी नेहमीच पाटील गटाला सहकार्य केलं आहे. चुकीच्या पद्धतीने त्यांचा कारभार सुरू आहे. त्यांच्या भ्रष्टाचाराची पाळेमुळे बाहेर काढल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही" असा इशारा गांधीनगरच्या ग्रामपंचायत सदस्य व गांधीनगर एकता मंचच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.

याशिवाय गांधीनगर एकता मंचच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले की, 'ज्यावेळी ग्रामपंचायत निवडणूक झाली तेव्हा संदीप पाटोळे यांना कोणीही ओळखत नव्हते. गांधीनगर एकता मंचमुळे त्यांना सरपंच पद मिळाले. मात्र निवडून आल्यानंतर सुरुवातीचे काही महिन्यात वगळता संदीप पाटोळे व अन्य एका सदस्याने नेहमीच विरोधी गटाशी हातमिळवणी केली. संदीप पाटोळे यांची सरपंच पदाची कारकीर्द ही प्रभावी राहिली नाही. सरपंच झाल्यापासून भ्रष्टाचार व गैरकृत्याच्या माध्यमातून पैसे मिळवण्यासाठी वाटेल त्या थराला जाण्यास सुरुवात केली होती.'

Gandhinagar Sarpanch
Sharad Pawar Barshi Tour : बार्शीच्या दौऱ्यावर येणारे शरद पवार दिलीप सोपलांवर काय बोलणार?

तसेच 'गेल्यावर्षी उपसरपंच पदाच्या निवडणूकमध्ये नेत्यांचा आदेश डावलून त्यांनी सतेज पाटील(Satej Patil) गटाला मदत केली. त्यांची पावले ओळखून त्यांच्या सरपंचपदाच्या गैरकारभाराच्या विरोधात कारवाईची मागणी करत आम्ही साऱ्यांनी कायदेशीर मार्ग अवलंबला. यामधून आपले पद जाणार याची जाणीव त्यांना झाली होती. म्हणून त्यांनी डिजिटल सिग्नेचरचा (डीएससी) मुद्दा उपस्थित करून विरोधी गटात प्रवेश केला.' असा आरोपही केला.

गांधीनगरच्या सरपंच संदीप पाटोळे व सदस्य गजेंद्र हेगडे यांनी काही दिवसांपूर्वी आमदार सतेज पाटील व ऋतुराज पाटील यांचे उपस्थितीमध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. गांधीनगरच्या विकासासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान गांधीनगर एकता मंच व भाजपच्या ग्रामपंचायत सदस्यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन सरपंच संदीप पाटोळे यांच्यावर आरोप केले.

ग्रामपंचायत सदस्य रितू लालवानी, लक्ष्मी धामेजा, रीना अवघडे, सरिता कटेजा,, रवी मल्लानी, दीपक जमनाने, भाजपचे युवराज अडवाणी, किसान वधवा, अमित बडेजा याने संयुक्तपणे पत्रकार परिषद घेतली.

Gandhinagar Sarpanch
Vishalgad Riot Case : विशाळगड हिंसाचार प्रकरण: 17 जणांना जामीन; तर सात जणांचा फेटाळला

पाटलांना श्रेय देण्यासाठी प्रवेश -

वास्तविक गांधीनगरला महसुली गावाचा दर्जा प्राप्त व्हावा आणि डीएससी चा अधिकार मिळावा यासाठी खासदार धनंजय महाडिक(Dhananjaya Mahadik), माजी आमदार अमल महाडिक जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शौमिका महाडिक हे गेले वर्षभर प्रयत्नशील आहेत. त्यांच्या प्रयत्नांना यश येत आहे. मात्र संदीप पाटोळे यांनी आपला स्वार्थ साधण्यासाठी व भ्रष्टाचारावर पांघरून घालण्यासाठी आमदार सतेज पाटील यांनी डीएससीचे काम केले म्हणून तिकडे गेलो. असे खोटे सांगत आहेत लोकांची दिशाभूल करत आहेत. असा आरोपही सदस्यांनी केला आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com