Ambadas Danve on Eknath Shinde : 'महिषासुराची औलाद महाराष्ट्रात जन्मली!', दानवेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

Ambadas Danve At Kolhapur : गद्दारांना नाक नसतं!, अशा शब्दात त्यांनी निशाणा साधला आहे. पाहा नेमकं काय म्हणाले अंबादास दानवे ?
Ambadas Danve
Ambadas DanveSarkarnama
Published on
Updated on

Ambadas Danve : विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. कोल्हापुरात आल्यानंतर त्यांनी करवीर निवासिनी श्री. अंबाबाई देवीचे दर्शन घेतले. श्री अंबाबाई ही शक्ती आणि ऊर्जेची देवता आहे. शिवसेना आणि शिवसैनिकाला ऊर्जा प्राप्त होते. महाराष्ट्रात महिषासुराची औलाद जन्मली आहे. त्याचं निर्धालन करण्याची शक्ती आमच्या मनामध्ये द्यावी, अशी अंबाबाई चरणी प्रार्थना केली असल्याचे अंबादास दानवे यांनी यावेळी सांगितले.

'शासन आपल्या दारी' हे केवळ सरकारी यंत्रणा आणि जाहिरातींचा वापर करून केलेली 'शो बाजी' आहे. राज्यात अनेक ठिकाणी जनता दरबार घेत आहे. सरकारचा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम केवळ भास आणि बोगस कार्यक्रम असल्याची टीका दानवे यांनी केली. (Ambadas Danve on Eknath Shinde)

'शासन आपल्या दारी' हे केवळ सरकारी यंत्रणा आणि जाहिरातींचा वापर करून केलेली 'शो बाजी' आहे. राज्यात अनेक ठिकाणी जनता दरबार घेत आहे. सरकारचा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम केवळ भास आणि बोगस कार्यक्रम असल्याची टीका दानवे यांनी केली.

राष्ट्रवादीच्या निर्णयावर बोलताना, अंपायर वगैरे सगळे ठरलेले होते. केवळ हात कधी वर करायचा बाकी होता तो त्यांनी परवा केला. जे शिवसेनेच्या बाबतीत घडलं ते जगाला आणि राज्याला माहीत आहे. तशी राष्ट्रवादी काँग्रेस ही कोणाची आहे सर्वांना माहीत आहे. (Ambadas Danve At Kolhapur )

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ambadas Danve
Maharashtra Politics: मुश्रीफ म्हणतात वेळ बदलली, पण नेटकऱ्यांनी काटे फिरवले उलटे!

शरद पवारांची राष्ट्रवादी असताना बहुमताच्या जोरावर अशा पद्धतीचा निकाल दिला. लोकशाही पूर्णपणे गुंडाळून ठेवण्यात आली आहे. निवडणूक आयोग हा भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात काम करणारा नोकर झाला असल्याचे दानवे यांनी सांगितले.

मागच्या पोट निवडणुकीमध्ये अनेक गुंडांना पॅरोल वर सोडण्यात आले होते. गुंडांचे राज्य या महाराष्ट्रात आहे. भाजप आणि शिंदे गटाचे (Eknath shinde) आमदार गोळीबार करत आहेत आणि कारवाई काय होत आहे? ठाणे, भिवंडी या भागांमध्ये जमीन हडपणे आणि नावावर करून घेणे प्रकार सरकारच्या आशीर्वादाने सुरू आहेत. ठिकठिकाणी सरकारकडून आश्रय दिले जात आहे. पोलिस सुद्धा सरकारच्या हातातील बाहुले बनलेत, अशा शब्दात दानवे यांनी जोरदार टीका केली. (Ambadas Danve At Kolhapur)

पुरंदर एव्हीएम चोरी...

ईव्हीएम मशीन चोरून बदलून आणून ठेवण्याचा प्रयत्न असेल. मशीनमध्ये खाडाखोड झाल्याचे राजस्थानच्या निवडणुकीमध्ये समोर आले आहे. ईव्हीएम मशीन सुरक्षित नसेल तर हे राज्य कोणाचं आहे? ही चोरी उघड झाली म्हणून या चोरीला कोणाचा पाठिंबा असेल? निवडणुकी आधी काही मशीन घेऊन गेले असतील आणि निवडणुकांच्या तोंडावर पुन्हा आणून ठेवतील, असा आरोप दानवे (Danve) यांनी सरकारवर केला. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना इशारा देण्याचे धमक त्यांच्यात नाही. त्यांना इशारा द्यायचा असता तर ते समोरासमोर येऊन बोलले असते. गद्दार लोकांना नाक नसत आणि तोंडही नसतं, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत दानवे यांनी हल्लाबोल केला.

पंतप्रधान किसान योजना

पंतप्रधान किसान निधी योजना ही शेतकऱ्यांच्या डोळ्यात धुळ फेक करणारी योजना आहे. पीएम किसान योजनेचे खातेदार कमी व्हावेत, हा सरकारचा प्रयत्न आहे. या सरकारला ही योजना गुंडाळून ठेवायची आहे. सरकारचं काम हे देशाला देशोधडीला घेऊन जाणारे असल्याची टीका दानवे यांनी केली.

Edited By : Rashmi Mane

Ambadas Danve
Satara News: सातारा लोकसभेला महायुतीत ट्विस्ट;गोरेंनी वाढवलं भोसलेंचं टेन्शन; उदयनराजे अडचणीत...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com