Ahmednagar News : राज्यात जातीय, धर्मांध शक्तींचा उच्छाद; आंबेडकरी संघटनांचा राज्य सरकारवर निशाणा

Nanded Murder Protest in Nagar : नांदेडच्या घटनेचा निषेधार्थ १३ जूनला जन आक्रोश मोर्चा
Ahmednagar News
Ahmednagar NewsSarkarnama
Published on
Updated on

Dalit Community Protest on 13 June : महाराष्ट्रात जातीय व धार्मिक शक्तींनी उच्छाद मांडला आहे. त्यांना संरक्षण व अभय देण्याचे काम शिंदे-फडणवीस सरकार करत आहे, असा आरोप आंबेडकरी विचारांच्या आंबेडकरी विचारांच्या संघटनेतील नेत्यांनी केला आहे.

नांदेड (Nanded) येथे दलित तरुणाची हत्या करण्यात आली. त्या घटनेच्या निषेधार्थ अहमदनगर येथे जन अक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात येणार आहे. हा मोर्चा १३ जून रोजी अहमदनगर पालिका ते जिल्हाधिकारी कार्यालय असा असणार आहे. याबाबत पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. त्यावेळी या नेत्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.

Ahmednagar News
Rahul Narwekar News : राहुल नार्वेकरांचं मोठं विधान; म्हणाले, "मी लवकरच क्रांतीकारी निर्णय..."

यावेळी ज्येष्ठ आंबेडकरी नेते अशोकराव गायकवाड म्हणाले, "महाराष्ट्रात जातीय व धार्मिक शक्तींनी उच्छाद मांडला आहे. या प्रवृत्तीला संरक्षण व अभय देण्याचे काम राज्य सरकार (State Government) करीत आहे. परिणामी आंबेडकरी चळवळीतील तरुणांची हत्या होत आहेत. (Nanded) नांदेडमधील जातीयवादी व धर्मांध तरुणांनी केलेली हत्या पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारी नाही. या घटनेमुळे दलित समाजात भीतीचे, दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे."

Ahmednagar News
Manipur Violence News : डबल इंजिनचं सरकार, तरीही मणिपूर अशांतच ; ठाकरे गटाचा मोदींवर निशाणा

या घटनेचा तीव्र निषेध अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील आंबेडकरी बहुजन पुरोगामी जनतेच्या वतीने करण्यात येणार आहे. त्यानिमित्त १३ जून रोजी अहमदनगर पालिका येथून सकाळी १० वाजता मोर्चाचे आयोजन केले आहे. हा मार्चा जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे धडकणार आहे. यात जिल्ह्यातील व शहरातील आंबेडकरी बहुजन पुरोगामी जनतेने सहभागी व्हावे, असे जन आक्रोश मोर्चा आयोजकांनी आवाहन केले आहे.

Ahmednagar News
PMC News : खूशखबर ! पुणे पालिकेच्या समाज विकास विभागातील १६० कर्मचारी कायम सेवेत

यावेळी ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड, सुरेश बनसोडे, सुमेध गायकवाड, किरण दाभाडे, संजय कांबळे, रोहित आव्हाड, प्रा.जयंत गायकवाड, आकाश जाधव, सुनील शिंदे, अक्षय भिंगारदिवे, सुशांत म्हस्के, योगेश साठे, बंटी भिंगारदिवे, सागर ठोकळ, अतुल भिंगारदिवे, जीवन कांबळे, नितीन कसबेकर, योगेश थोरात, सोमा शिंदे, विवेक भिंगारदिवे, विशाल भिंगारदिवे आदिसह समस्त आंबेडकरी बहुजन समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com