Rahul Narwekar News : राहुल नार्वेकरांचं मोठं विधान; म्हणाले, "मी लवकरच क्रांतीकारी निर्णय..."

Shivsena MLA : शिंदे गटाच्या १६ आमदारांबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता
Rahul Narwekar
Rahul NarwekarSarkarnama
Published on
Updated on

Rahul Narwekar Statement : सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाच्या १६ आमदारांना अपात्र ठरवण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिला आहे. नार्वेकरांनी योग्य काळात यावर निर्णय घेणे अपेक्षित असल्याचेही न्यायालयाने नमूद केले. त्यानंतर नार्वेकर आता काय निर्णय घेतील याकडे राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. असे असताना नार्वेकरांनी लवकरच क्रांतीकारी निर्णय घेईन, असे विधान केले. त्यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळातून भुवया उंचवल्या आहेत.

न्यायालयाच्या निकालानंतर (Uddhav Thackeray) ठाकरे गटाकडून विधानसभा अध्यक्षांनी १५ दिवसांत निर्णय घ्यावा, अशी मागणी केली होती. त्यावर नार्वेकरांनी ठाकरे गटाला सडेतोड उत्तर दिले होते. ते म्हणाले होते की, "मागण्या सर्वजण करतात. मात्र, कायद्यानुसार काही तरतूदी आहेत. इतरही काही कायदेशीर बाबी आहेत. त्या सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच निर्णय घेण्यात येईल.

यानंतर निर्णय घेण्यासाठी विलंब करायचा नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) म्हणाले होते की,"आपल्याला निर्णय घेण्यासाठी घाई करायची नाही व विलंबही करायचा नाही. जो निर्णय होईल, तो निर्णय संविधानातील तरतुदी व न्यायालयाच्या निर्देशानुसारच घेतला जाईल."

Rahul Narwekar
Jejuri Temple Trust : 'येळकोट येळकोट जय मल्हार!' खंडोबा देवस्थान विश्वस्तमंडळावर आता स्थानिकांचं वाढलं 'बळ'

दरम्यान, आज बुधवारी (ता. ७) राजभवनात आयोजित केलेल्या कार्यक्रमात नार्वेकरांनी एक विधान केले. त्यामुळे आता शिंदे गटाच्या (Shivsena) १६ आमदारांबाबत लवकरच निर्णय येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. नार्वेकरांनी यावेळी माजी विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब देसाईंच्या कामाचा दाखला दिला. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

Rahul Narwekar
Thane News : 'आनंद दिघें'वरुन ठाण्यात शिवसेना राष्ट्रवादी आमने सामने; परांजपेंचा जोरदार पलटवार

राहुल नार्वेकर म्हणाले, "१९७७ साली माझा जन्म झाला. त्याच साली बाळासाहेब देसाईंवर विधानसभा (Vidhansabha) अध्यक्षपदाची जाबाबदारी आली. त्यांनी आपल्या राजकीय आयुष्यात काही क्रातिकारी निर्णय घेतले. त्याच प्रमाणे कदाचीत मीही लवकरच क्रांतीकारी निर्णय घेईन." नार्वेकरांच्या या विधानाने लवकरच शिंदे गटाच्या आमदारांबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com