PM Modi Photo Controversy : मोदींचा फोटो हटवल्याने वाद; सुषमा अंधारेंकडून अमित ठाकरेंची पाठराखण, भाजपवर पलटवार

Sushma Andhare supports Amit Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी पुण्याचा दौरा करत विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
Sushma Andhare backs Amit Thackeray over PM Modi photo
PM Modi photo removed by Amit ThackeraySarkarnama
Published on
Updated on

PM Modi photo removed controversy: महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे सध्या पुणे दौऱ्यावर असून, त्यांनी पुण्यातील गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक महाविद्यालयाला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या भेटीदरम्यान वसतिगृहातील अस्वच्छ स्वच्छतागृह, मेसच्या जेवणात आढळलेल्या आळ्या आणि कॅन्टीनमधील सडलेले कांदे पाहून अमित ठाकरे आक्रमक झाले. त्यांनी ते सडलेले कांदे प्राध्यापकांच्या कार्यालयात नेऊन, आजच्या आज सोयी-सुविधा न सुधारल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.

फोटो हटवण्यावरून वाद

प्राध्यापकांच्या कार्यालयात पाहणी करत असताना एका विद्यार्थ्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्राबाबत प्रश्न उपस्थित केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोशेजारी पंतप्रधान मोदींचा फोटो नको, असे सांगत अमित ठाकरे यांनी कार्यकर्त्यांच्या मदतीने तो फोटो तेथून हटवायला लावला. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात नवा वाद पेटला असून, भाजपने अमित ठाकरेंवर टीकेची झोड उठवली आहे.

सुषमा अंधारे मैदानातून

या वादावर आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी अमित ठाकरेंच्या भूमिकेचे समर्थन करत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. अंधारे म्हणाल्या, अमित ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींचा फोटो नको, असे म्हटले नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शेजारी राजकीय नेत्यांचा फोटो असू नये, ही भूमिका मांडली आहे.

Sushma Andhare backs Amit Thackeray over PM Modi photo
Amit Thackeray Nashik : कायद्याच्या बालेकिल्ल्यात कॉलेजबाहेर टवाळखोरांचा त्रास; विद्यार्थिनींची अमित ठाकरेंकडे तक्रार, पोलिसांचा लगेचच दणका

छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक यांनी या देशाची ऐतिहासिक आणि वैचारिक पायाभरणी केली आहे. अशा महापुरुषांच्या पंक्तीत कोणत्याही राजकीय नेत्याचा फोटो येऊ शकत नाही, ही अमित ठाकरेंची भूमिका रास्त आहे.

भाजपच्या दुटप्पीपणावर टीका

भाजपने साप समजून भुई आपटणे बंद केले पाहिजे. सरन्यायाधीशांसारख्या सर्वोच्च घटनात्मक पदाच्या दिशेने चप्पल भिरकावली जाते, तेव्हा भाजपचे नेते मूग गिळून गप्प बसतात; मात्र आता उर बडवून राजकारण करत आहेत, असा दुटप्पीपणा भाजप दाखवत आहे.

Sushma Andhare backs Amit Thackeray over PM Modi photo
Sushma Andhare : "फीती कापताना कॅमेऱ्यासमोर येणारे बाळांच्या मृत्यूवर गायब का?" अमरावती रुग्णालय मृत्यू प्रकरणावरून अंधारे आक्रमक

अमित ठाकरेंच्या भूमिकेला पाठिंबा

ही लढाई कुठल्या पक्षाची किंवा राजकीय दृष्टिकोनाची नसून, महापुरुषांचा सन्मान राखण्याची आहे. त्यामुळे पक्षीय सीमा बाजूला ठेवून अमित ठाकरेंच्या या भूमिकेला आपण ठाम पाठिंबा देत असल्याचे सुषमा अंधारे यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com