Kolhapur Crime News : हातात सुरा घेऊन पोलिसाचा दहशत माजवण्याचा प्रयत्न; व्हिडिओ व्हायरल

Kolhapur News : करवीर तालुक्यातील पाचगावमधील शांतीनगर गाडगीळ कॉलनीतील आहे.
Kolhapur Police
Kolhapur PoliceSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : आत्तापर्यंत पुण्यातील कोयता गँग ही रस्त्यावर दहशत माजवत असल्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या, पण एखाद्या पोलिसालाच हातात कोयता घेऊन दहशत माजवताना पाहिले आहे का, असा प्रश्न विचारला तर तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.

पण कोल्हापुरात असा प्रकार समोर आला आहे. कोल्हापुरात एक पोलिस हातात सुरा घेऊन दहशत माजवत असल्याचा व्हिडिओ कोल्हापुरात व्हायरल होत आहे. सध्या या व्हिडिओची चर्चा पोलिस दलात सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित प्रकार हा करवीर तालुक्यातील पाचगावमधील शांतीनगर गाडगीळ कॉलनीतील आहे. गल्लीतील दोन कुटुंबांमध्ये तीन महिन्यांपूर्वी वाद झाला होता. विनोद कुमार वावरे आणि आशुतोष शिंदे या कुटुंबात हा वाद पुन्हा बुधवारी सुरु झाला.

रात्री 8:45 च्या सुमारास दोघेही एकमेकांच्या घरासमोर उभे होते. त्यावेळी घरगुती कारणावरून झालेल्या शिंदे यांनी थेट सुरा आणून गल्लीत दहशत माजवली. (Crime News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Kolhapur Police
Nitin Gadkari News : कोसळलेल्या उड्डाण पुलाला नितीन गडकरींचे नाव! मनसेची खोचक बॅनरबाजी

संबंधित पोलिसाच्या विरोधात गुन्हा दाखल

सध्या सोशल मीडियावर पोलिस हातात सुरा घेऊन गल्लीत दहशत माजवत असल्याचे दिसून येते. कौटुंबिक वाद झाल्यानंतर विनोद कुमार वावरे यांनी करवीर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. आशुतोष शिंदे, रेश्मा शिंदे,आणि स्वप्निल शिंदे यांच्या विरोधात तक्रार दिली आहे.

वावरे हे दारात उभारले, शिंदे यांनी येऊन माझ्या बायकोकडे का बघतोस म्हणून मारहाण करून गेटवर लाथा बुक्क्या मारल्या आहेत. अशा पद्धतीची तक्रार पोलिसात दिली आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी शिंदे यांच्यावर अदखलपात्र गुन्हा नोंद केला आहे

पोलिस दलात खळबळ

संबंधित व्हिडिओ हा सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याची चर्चा कोल्हापूर जिल्ह्यात पसरली. पोलिस दलातदेखील या व्हिडिओची चर्चा रंगली आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Kolhapur Police
Kolhapur Collector News : नवीन जिल्हाधिकारी येण्यापूर्वीच नेत्यांचा विरोध; भ्रष्ट अधिकारी कोल्हापुरात नको!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com