माढा (जि. सोलापूर) : गावातील जत्रा म्हणजे मानापमान रंगणारे हक्काचे ठिकाण. कुस्त्याचा फड, मनोरंजनाचा कार्यक्रम आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमात मानापमानाचा खेळ रंगतोच रंगतो. पण, सोलापूर (Solapur) जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील केवड येथील ग्रामस्थांनी त्यावर एक नामी उपाय शोधला आहे. यात्रेतील ऑर्केस्ट्राच्या कार्यक्रमाचा नारळ फोडण्यासाठी चक्क लिलावच पुकारला आहे. त्या लिलावात सर्वाधिक ५५ हजारांची बोली लावत तरण्याबांड पोरांना मात देत चक्क साठी पार केलेल्या शेतकऱ्याने नारळ फोडण्याचा मान मिळविला आहे. (An auction was called to break the coconut of the spectacle in the fair)
सध्या ग्रामीण भागात जत्रा सुरू आहेत. गावची जत्रा अन् कारभारी सतरा अशी म्हण प्रचलित आहे. जत्रांमध्ये गाव कारभाऱ्यांची संख्याही अधिक पाहायला मिळते. हेच कारभारी कधी कधी यात्रा कमिटीसाठी डोकेदुखी ठरते. अशा गाव कारभाऱ्यांना चाप लावण्यासाठी माढा तालुक्यातील केवड ग्रास्थांनी नामी शक्कल लढवली आहे.
जत्रेतील ऑर्केस्ट्राचा नारळ फोडण्यासाठी चक्क लिलाव करण्यात आला आहे. नारळ फोडण्याचा हा लिलाव गावातील भगवान लटके या साठी (६०) ओलांडलेल्या ग्रामस्थाने ५५ हजार रूपयांना घेतला आहे. केवडचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ-जोगेश्वरी मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी ही रक्कम वापरण्यात येणार आहे.
गावातील सार्वजनिक समारंभ असो की गावची जत्रा यात्रा असो, अशा कार्यक्रमाध्ये मानापानासाठी आजही अनेकांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळते. यातूनच वाद तंटे निर्माण होतात. यावर उपाय म्हणून केवड गावातील तरुणांनी पुढाकार घेत जत्रेतील तमाशाचा नारळ फोडण्यासाठी आर्केस्ट्रा (मनोरंजनाच्या) कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यासाठी अर्थात नारळ फोडण्यासाठी गावकऱ्यांनी एकत्रित येऊन गावातील काळभैरवनाथ मंदिरातच बोली लावली.
बोलीत ऑर्केस्ट्राचा नारळ फोडण्यासाठी तब्बल ५५ हजार रुपये मोजण्यात आले. ऑर्केस्ट्राचा नारळ फोडण्याचा मान भगवान नरहरी लटके यांना मिळाला आहे. लटके हे व्यवसायाने शेतकरी आहेत. लटकेंनी बाजी मारताच उपस्थित ग्रामस्थांनी टाळ्यांचा कडकडाट केला. काही उत्साही तरुणांनी लटके यांना खांद्यावर उचलून घेऊन जल्लोष केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.