BJP Invite Arun Jagtap : विखेंचे निमंत्रण; अजितदादा गटाचे अरुणकाका जगताप भाजपत येणार?

BJP Politics : खासदार विखेंच्या निमंत्रणावर मात्र भाजप संघटनेमध्ये राेष दिसत आहे.
BJP Politics :
BJP Politics :Sarkarnama
Published on
Updated on

Nagar Political News : भाजपचे नगरमधील खासदार डाॅ. सुजय विखे यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे माजी आमदार अरुण जगताप यांना भाजपमध्ये येण्याचे निमंत्रण दिल्याने भाजप संघटनेमध्ये अस्वस्थता पसरली आहे. हे निमंत्रण माजी आमदार अरुण जगतापांपेक्षा त्यांचे पुत्र विद्यमान आमदार संग्राम जगताप यांना आहे, अशी चर्चा रंगली आहे. खासदार विखेंच्या जगताप निमंत्रणावर भाजपची नगरमधील संघटना सावध झाली आहे. या निमंत्रणावरून भाजप पक्ष संघटना खासदार विखेंविरुद्ध आक्रमक हाेणार, असे संकेत मिळू लागले आहेत.

भाजप हा शिस्तप्रिय संघटनेवर चालणारा पक्ष आहे. पक्षात संघटनेच्या निर्णयाला खूप महत्त्व आहे. लाेकप्रतिनिधीला पक्षाबाबत काेणताही निर्णय घ्यायचा असेल, तर संघटनेला विश्वासात घ्यावे लागते. खासदार विखेंनी शब्दगंध साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून माजी आमदार अरुण जगताप यांना भाजपमध्ये येण्याचे जाहीर निमंत्रण दिले. खासदार विखेंच्या निमंत्रणावर मात्र भाजप संघटनेमध्ये राेष दिसतो आहे. लाेकप्रतिनिधींनी पक्षाच्या माध्यमातून विकासकामे करावीत. पक्ष संघटनेशी निगडित असलेले विषय, संघटनेवर साेपवून द्यावेत. भाजप हा पक्ष संघटनेवर चालणारा पक्ष आहे. पक्ष संघटना त्यांचे निर्णय घेण्यास सक्षम आहे, अशी कुजबूज वरिष्ठांमध्ये सुरू झाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

BJP Politics :
Akola News : सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलवरून श्रेयवादाची लढाई; भाजप-काँग्रेस आमनेसामने

खासदार विखेंचे हे जाहीर निमंत्रण चाचपणीदेखील असू शकते, असेही संघटनेत बाेलले जात आहे. खासदार विखेंनी निमंत्रण देताना थेट आमदार संग्राम जगताप यांना देण्याऐवजी त्यांचे वडील माजी आमदार अरुण जगताप यांना दिले आहे. परंतु, खासदार विखेंची आमदार संग्राम जगताप यांच्याशी असलेली मैत्री पाहता, त्यांच्या निमंत्रणाचा राेख हा आता लपून राहत नाही.

खासदार विखेंनी या निमंत्रणातून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याही गटाला हात घातला आहे. आता अजित पवारांचा गट यावर काय प्रतिक्रिया देताे किंवा जगताप पिता-पुत्र यावर काय भूमिका घेतात, याकडे नगरवासीयांचे लक्ष लागले आहे. नगरमध्ये जुन्या राजकारणाचा पट उघडल्यास शिवसेनेला राेखण्यासाठी राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर भाजपचा महापाैर महापालिकेत झाला हाेता. त्यामुळे भाजप संघटनेचा या निमंत्रणाला असलेला आक्रमक विराेध किती काळ टिकेल, हे पाहण्यासारखे राहणार आहे.

माजी आमदार अरुण जगताप यांना भाजपमध्ये घेऊन त्यानंतर आमदार संग्राम जगताप यांचा मार्ग सुकर करण्याची रणनीती खासदार विखेंनी आणि माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी आखली नाही ना!, असेही बाेलले जात आहे. खासदार विखेंचे हे निमंत्रण नगर शहरातील पुढील काळातील राजकारण ढवळून काढणार हे निश्चित!

Edited By- Anuradha Dhawade

BJP Politics :
Attack On Heramb Kulkarni : सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्यावर प्राणघातक हल्ला

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com