Anand Chandanshive
Anand ChandanshiveSarkarnama

Anand Chandanshive : राष्ट्रवादीत आनंद चंदनशिवेंना 'प्रमोशन'; राज्याच्या राजकारणात मिळाली महत्वाची जबाबदारी

NCP Ajit Pawar Party : माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे यांची राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी चंदनशिवे यांच्या नियुक्तीची घोषणा केली आहे.
Published on

Solapur, 03 October : सोलापूर महापालिकेतील माजी गटनेते आनंद चंदनशिवे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रमोशन मिळाले आहे. लोकसभा निवडणुकीच्या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांच्यासोबत गेलेले चंदनशिवे यांना आता राज्य स्तरावर काम करण्याची संधी मिळणार आहे.

आंबेडकरी चळवळीतील एका कार्यकर्त्याला राज्यात चमकण्याची संधी अजित पवार यांनी उपलब्ध करून दिली आहे, आता चंदनशिवे त्याचा कसा उपयोग करतात, हे पाहावे लागणार आहे.

माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे यांची राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी चंदनशिवे यांच्या नियुक्तीची घोषणा केली आहे. तसेही पत्रही प्रदेश राष्ट्रवादीकडून चंदनशिवे यांना पाठविण्यात आले आहे.

नियुक्तीचे पत्र देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने चंदनशिवे यांच्याकडून काही अपेक्षाही ठेवल्या आहेत. नियुक्ती पत्रात म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपले सहकार्य राहील, असा विश्वासही पत्रातून व्यक्त करण्यात आलेला आहे.

Anand Chandanshive
Chandrakant Patil : चंद्रकांतदादांचा उद्धव ठाकरेंना इशारा; ‘निवडणुकीत सगळ्यांचा हिशेब केला जाईल...’

सोलापूर महापालिकेत आनंद चंदनशिवे सलग तीन वेळा निवडून आले आहेत. बहुजन समाज पक्षाचे प्रतिनिधीत्व त्यांनी सोलापूर महापालिकेत केले. मागील २०१९ मध्ये विधानसभेची निवडणूक चंदनशिवे यांनी वंचित बहुजन आघाडीकडून लढवली होती. सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातून लढविलेल्या त्या निवडणुकीत त्यांना अपयश आले हेाते.

विधानसभा निवडणुकीनंतर आनंद चंदनशिवे हे वंचित बहुजन आघाडीपासून लांब गेले होते. अजित पवार यांच्या सोलापूरच्या दौऱ्यात ते शेवटपर्यंत त्यांच्यासोबत होते. त्यानंतर काही दिवसांत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. गेल्या वर्षभरापासून त्यांच्याकडे राष्ट्रवादीत कोणतेही पद नव्हते. मात्र, त्यांची आता थेट राज्याच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Anand Chandanshive
Harshvardhan Patil : हर्षवर्धन पाटलांच्या भाजप सोडण्यावर चंद्रकांतदादांची प्रतिक्रिया : ‘मला काय मिळणार, हा विचार..’

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे आंबेडकरी चळवळीतील राज्यभर ओळख असणाऱ्या नेत्याची कमतरता आहे. पक्षाचा आंबेडकरी चळवळीचा चेहरा बनण्याची संधी आनंद चंदनशिवे यांना मिळाली आहे. आता चंदनशिवे त्याचा कसा उपयोग करतात, हे पाहावे लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com