Chandrakant Patil : चंद्रकांतदादांचा उद्धव ठाकरेंना इशारा; ‘निवडणुकीत सगळ्यांचा हिशेब केला जाईल...’

Uddhav Thackeray Vs BJP : पालघरमध्ये साधु-संतांना ठेचून मारण्यापासून ते दिशा सालियान हिच्यावरील बलात्कारपर्यंत, तसेच सुशांत सिंग राजपूत हत्या की आत्महत्यापर्यंत (मी काही न्यायाधीश नाही) अशा घटनेमुळे संपूर्ण देश हादरला, अशा अनेक घटनांची मोठी यादीच आहे.
Chandrakant Patil-Uddhav Thackeray
Chandrakant Patil-Uddhav Thackeray Sarkarnama
Published on
Updated on

Solapur, 03 October : महाराष्ट्रामध्ये सध्या जर अराजकता आहे, असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंचं म्हणणं असेल, तर तुम्हीही अडीच वर्षे सत्तेत होतात, त्यातली अराजकतेची यादीच मी तुम्हाला देतो. निवडणुकीत सगळ्यांचा हिशेब पूर्ण केला जाईल, असा इशारा सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना दिला.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या विधानावर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी पलटवार केला. तुमच्या काळातील अराजकतेची यादीच माझ्याकडे आहे. असे सांगून चंद्रकांतदादा म्हणाले, पालघरमध्ये साधु-संतांना ठेचून मारण्यापासून ते दिशा सालियान हिच्यावरील बलात्कारपर्यंत, तसेच सुशांत सिंग राजपूत हत्या की आत्महत्यापर्यंत (मी काही न्यायाधीश नाही) अशा घटनेमुळे संपूर्ण देश हादरला, अशा अनेक घटनांची मोठी यादीच आहे.

उद्धव ठाकरे यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड मारणाऱ्यांनी स्वतःचं घरदेखील काचेचे आहे, हे विसरू नये, अशा शब्दांत उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी उद्धव ठाकरेंना इशारा दिला.

भारतीय जनता पार्टी (BJP) ही सुसंस्कृत पार्टी असल्याने थोडीशी संस्कृती पाळून अशा आरोपांना उत्तर देतो. पण, निवडणुकीत वेळ आली आहे. आता सगळ्यांचा हिशेब पूर्ण केला जाईल, त्यामुळे तुम्ही आता एक विषय मांडला, तर आम्ही चार विषय मांडू, असा इशाराही चंद्रकांत पाटील यांनी दिला.

Chandrakant Patil-Uddhav Thackeray
Harshvardhan Patil : हर्षवर्धन पाटलांच्या भाजप सोडण्यावर चंद्रकांतदादांची प्रतिक्रिया : ‘मला काय मिळणार, हा विचार..’

ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कधी लागणार याबाबतही चंद्रकांत पाटील यांनी आपला अंदाज वर्तविला. ते म्हणाले, सर्व परिस्थितीचा विचार करता दसऱ्यानंतर आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. पण, हे सर्व अंदाज आहेत, त्यामुळे मी भाकीत वर्तवलंय, असं तुम्ही म्हणू नका.

आमच्या पार्टीच्या बाबतीत मी कधीही बोलत नाही. मी कायम म्हणतो देवेंद्र फडणवीस बोलतील, तसे आता त्यांनी देखील ठरवले पाहिजे की नेमकं कोणी बोललं पाहिजे. अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे राजकीय नेत्यांमध्ये असंतोष वाढत चाललेला आहे, अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली.

Chandrakant Patil-Uddhav Thackeray
Abhijeet Patil : बबनदादांना ‘विठ्ठल’ची बॅलन्सशीट तपासण्याचा अधिकार नाही; अभिजीत पाटलांनी खडसावले

संजय गायकवाड यांचे वक्तव्य हे विश्लेषण आहे. पण माझं म्हणणं असं आहे की, जसे महाविकास आघाडीचे ठरले आहे की, सकाळी संजय राऊत बोलतील आणि दिवसभर त्याची री ओढली जाते. तसे महायुतीने देखील आता ठरवले पाहिजे की कोण बोलणार, म्हणजे बॅक फुटला जावे लागणार नाही, असेही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com