Devendra Fadnavis : ...अन् फडणवीसांनी गाॅगल घातलेल्या शहाजीबापूंना 'हिरो'च बनवलं; पिक्चरही सांगितला

Phaltan Political News : सांगोल्याचे आमदार शहाजीबापू बुधवारी देवेंद्र फडणवीस यांना हिरो दिसत होते.
Devendra Fadnavis -SHahaji Bapu Patil
Devendra Fadnavis -SHahaji Bapu PatilSarkarnama
Published on
Updated on

किरण बोळे-

Phaltan News : शिवसेनेत बंडानंतर सर्व आमदारांचे गुवाहाटी येथे वास्तव सुरु झाले.त्यात शिवसेनेचे नेते शहाजीबापू पाटील यांना एका कार्यकर्त्याने फोन केला. तो फोन काल त्यावेळी व्हायरल झाला. त्या फोनमध्ये अगदी लयबध्द पध्दतीने शहाजीबापू यांनी काय झाडी काय डोंगर काय हाटील असे म्हणत संपूर्ण महाराष्ट्रातील तणाव दूर केला होता. सांगोल्याचे आमदार शहाजीबापू बुधवारी (ता.17) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना हिरो दिसत होते.

पांढरे शुभ्र कपडे आणि त्यावर काळा गॉगल डोळ्याला लावून शहाजीबापू फलटणच्या सभेत बसले होते. निरा देवधर उजव्या कालव्याचे लोकार्पण करताना फडणवीस यांनी तीन नेत्यांची जोरदार तारीफ केली. त्यात खासदार रणजितसिंह निंबाळकर,सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील आणि ढाण्या वाघ म्हणून गोपीचंद पडळकरांचा (Gopichand Padalkar) समावेश आहे.

Devendra Fadnavis -SHahaji Bapu Patil
Salunkhe On ShahajiBapu : ‘सांगोल्याचा पुढचा आमदार मी किंवा शहाजीबापूच; इतरांनी भ्रमात राहू नये’ साळुंखेंचा इशारा कोणाला?

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी कालच जनता न्यायालयात महापत्रकार परिषद घेत शिवसेनेतील बंडाचा खुलासा केला. त्यावर फडणवीसांनी खास शैलीत उत्तर देत गुवाहाटीच्या 2022 च्या पिक्चरचे हिरो शहाजी बापू पाटील होते असे जाहीर सभेत सांगितले.

उद्धव ठाकरे यांनी कालच जनता न्यायालयात महापत्रकार परिषद घेत शिवसेनेतील बंडाचा खुलासा केला. आज त्यावर फडणवीसांनी खास शैलीत उत्तर देत गुवाहाटीच्या 2022 च्या पिक्चरचे हिरो शहाजी बापू पाटील(ShahajiBapuPatil) होते असे जाहीर सभेत सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

फडणवीस म्हणाले, 2022 मध्ये काय झाडी काय डोंगर काय हाटील म्हणणारे शहाजी बापू पाटील हे त्या वेळच्या पिक्चरचे हिरो होते. इतक्यावर ते थांबले नाहीत त्यांनी जसे जसे अवर्षणप्रवण सांगोल्यात पाणी मिळणे सुरु झाले तसे तसे शहाजीबापूंचे वय देखील कमी झाल्याचा दाखला फडणवीसांनी या सभेत दिला.

सांगोल्यात इतके पाणी पोहचत आहे की, इतर लोकांचे वय वाढते आणि शहाजीबापूंच्या आजच्या लुकवरुन त्यांचे वय कमी होत असल्याचा जोरदार पंच या सभेत मारला. बापूंनी देखील अगदी दोन्ही हात जोडून फडणवीसांच्या राजकीय 'पंच'ला हसत उत्तर दिले.

Devendra Fadnavis -SHahaji Bapu Patil
Political Analysis of Maharashtra : डॉ. आशिष देशमुखांच्या विधानानंतर भाजपमध्ये येऊ पाहणारे ते दोन माजी मुख्यमंत्री कोण ?

सातारा येथील फलटण येथे झालेल्या सभेत फडणवीसांनी जनतेला आणि नेत्यांना उन्हात बसविणाऱ्या खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या कामाची मुक्तकंठाने प्रशंसा केली. इतक्यावरच ते थांबले नाही तर या भागात पाणी खेचून आण्यात आणि त्याचा सतत पाठपुरावा करणार्या खासदार निंबाळकरांच्या पाठिशी उभे राहण्याचे व दुष्काळ संपविण्यासाठी साथ देण्याचे आवाहन फडणवीसांनी या सभेत केले.

दुष्काळ मुक्तीचा सोहळा साजरा करण्याची गरज यावेळी फडणवीस यांनी व्यक्त केली. दुष्काळाचा डाग पुसण्याचे काम खासदार निंबाळकर यांनी केल्याचा दावा फडणवीस यांनी केला. त्याचबरोबर या कामात इतरही आमदारांनी मोठे मोलाचे सहकार्य केल्याचा गौरव केला गेला.

(Edited By Deepak Kulkarni)

Devendra Fadnavis -SHahaji Bapu Patil
Latur Congress : शेतकऱ्यांचा ऊस फडातच; देशमुख काका-पुतण्याने गाळपासाठी सूत्रं हलवली...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com